घरमहाराष्ट्रआमदार योगेश कदम यांची अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

आमदार योगेश कदम यांची अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Subscribe

माजी केंद्रीय मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारचा शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूरजवळ रात्री 10.15 वाजता ही घटना घडली, या अपघातात सुदैवाने आमदार योगेश कदम यांनी कोणताही दुखापत झालेली नाही, मात्र कारमधील चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या अपघाताच्या घटनेनंतर योगेश कदम यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात कदम यांनी आपल्या फेसबुक पेजवर व्हिडीओ शेअर करत या अपघाताची माहिती दिली आहे.

योगेश कदम म्हणाले की, मुंबईला जात असताना माझ्या गाडीला भीषण अपघात झाला, रात्री 10.15 च्या सुमारास हा अपघात झाला, परंतु आई जगदंबेच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादने मी, माझे सर्व सहकारी या अपघातातून सुखरुप बचावलो आहोत.

- Advertisement -

आपण कोणीही आमची चिंता करू नका. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज एका मोठ्या अपघातातून आम्ही वाचलो आहोत. मला कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही, अशी माहितीही योगेश कदम यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, पुढील सर्व कार्यक्रम नियोजित जसे होते तसेच मी करणार आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी असू द्या, अशी प्रतिक्रिया आमदार कदम यांनी दिली आहे.

- Advertisement -

दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम शुक्रवारी रात्री मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला, रात्री 10.15 वाजता मुंबई-गोवा एक्सप्रेसवेवरील पोलादपूरजवळील कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत हा अपघात झाला. एका भरधाव डंपरने आमदार कदम यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली, ज्यात त्यांच्या कारचा चक्काचूर झाला आहे.

या अपघातातून आमदार योगेश कदम सुखरुप बचावले आहेत. मात्र त्यांच्या कार चालकाला आणि पोलीस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आहे. त्यांना चाळई येथील शासकीय रूग्णालयात उपचाराकरता दाखल केले आहे. या अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. या घटनेचा आता पोलिसांकडून वेगाने तपास सुरु आहे.


…तर रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे संजय राऊतांना चपलेन मारतील; राणेंचे धक्कादायक विधान

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -