घरताज्या घडामोडीआदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात शिंदे गटाचे उद्या शक्तिप्रदर्शन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात शिंदे गटाचे उद्या शक्तिप्रदर्शन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करत असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात आज, मंगळवारी बाळासाहेबांच्या शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करत असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात आज, मंगळवारी बाळासाहेबांच्या शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. (Shinde group power show tomorrow in Aaditya Thackeray Worli constituency)

या सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर हा सत्कार सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर नागरी सत्कारा यावेळी होईल. वरळी भोईवाडा समिती आणि सर्वोदय नाखवा समिती यांच्या माध्यमातून या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

या कार्यक्रमाच्या माध्यमातून वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. गेले कित्येक दिवस आदित्य ठाकरे हे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या आमदारांना गद्दार म्हणत टीका करीत आहेत. तसेच ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले आहे.

या पार्श्वभूमीवर आदित्य यांच्या टीकेला सोहळ्याच्या निमित्ताने उत्तर दिले जाईल,असे बोलले जात आहे. दरम्यान, शिंदे गटाने याआधीच वरळीतील दोन माजी नगरसेवकांना आपल्या गटात ओढले आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी आव्हान दिले होते की, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघात उभे राहून दाखवावे. या आव्हानाचं स्वीकार करत या सभेचे आयोजन केल्याची माहिती आहे. गेल्या कित्तेक दिवसांपासून आदित्य ठाकरे हे गद्दार असं म्हणत शिंदे गटावर टीका करत आहेत. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं ते उद्या काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा – पंतप्रधान मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर; पोलीस अलर्ट मोडवर तर, ‘या’ गोष्टींवर असणार बंदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -