घरताज्या घडामोडीबाळासाहेबांच्या 'त्या' वक्तव्याची आठवण करून देत शिंदे गटाने डिवचले उद्धव ठाकरेंना

बाळासाहेबांच्या ‘त्या’ वक्तव्याची आठवण करून देत शिंदे गटाने डिवचले उद्धव ठाकरेंना

Subscribe

शिवसेनेचा आज दसरा मेळावा आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच पक्षाचे दोन मेळावे होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचे दोन मेळावे होणार आहेत. ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. तर शिंदे गटाचा मेळावा बीकेसीवर होणार आहे. दरम्यान दोन्ही गटातून पोस्टर आणि टीझर्स जारी करण्यात आले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. बाळासाहेबांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना डिवचले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये ते म्हणतात की, राष्ट्रवादीसोबत कधीही सरकार स्थापन करणार नाहीत. बीकेसीवरील विशाल मैदानावरील शिंदे गटाच्या व्यासपीठाची चर्चा रंगली आहे. व्यास पीठावर मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही हे बाळासाहेबांचे विधान लिहिण्यात आले आहे.

- Advertisement -

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळावा परंपेरची सुरुवात केली. मागील अनेक वर्षांपासून आणि दशके देशाला पोखरून काढणारी स्वार्थी प्रवृत्ती उपटून काढण्याची खरी सुरूवात या मेळाव्यातून झाली, असं शिंदे गटातून सांगण्यात येत आहे.


हेही वाचा : चलो शिवाजी पार्क…, सूचक ट्वीट करत निलेश राणेंचा शिवसेनेच्या ठाकरे गटाला टोला

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -