घरमहाराष्ट्रशिंदे गटाच्या दीपक केसरकरांकडून 19 व्या मंत्र्याचे नाव जाहीर

शिंदे गटाच्या दीपक केसरकरांकडून 19 व्या मंत्र्याचे नाव जाहीर

Subscribe

आज शिंदे गट आणि भाजपकडून 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान शिंदे गटाच्या दीपक केसरकरांकडून 19 व्या मंत्र्याचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. शिंदे गट आणि भाजपकडून 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर मंत्र्यांचे खाते वाटप झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, मंत्र्यांचे अधिकृत खातेवाटप जाहीर झालेले नाही, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान दीपक केसरकर यांनी आपल्या मनातला 19 वा मंत्रीही जाहीर केला आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले 19 वे मंत्री असतील, अशा विश्वास केसरकरांनी व्यक्त केला आहे.

दीपक केसरकर काय म्हणाले? –

- Advertisement -

पावसाळी अधिवेशनानंतर सप्टेंबर महिन्यात मंत्रिमंडळाचा पुढील विस्तार होईल. पहिल्या टप्प्यात कोकणातून दोन मंत्री झाले आहेत, मी (दीपक केसरकर) आणि उदय सामंत. त्यामुळे भरत गोगावले यांना दुसऱ्या टप्प्यात संधी मिळेल असे वाटतंय, त्यांचे नाव न आल्याने मलाही वाईट वाटले. शेवटी मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे, हा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा अधिकार असतो. येत्या सव्वा महिन्यात मंत्रिमंडळाचा पुढील विस्तार होऊ शकतो. तूर्तास ४२ पैकी १८ मंत्र्यांचाच शपथविधी झाला आहे, असे केसरकर म्हणाले.

केसरकरांकडे पर्यावरण खाते?

- Advertisement -

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी प्रतिष्ठेचे केलेले पर्यावरण खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोखठोक बोलणाऱ्या तसेच शिंदे गटाची महिनाभर बाजू उचलून धरणाऱ्या दीपक केसरकरांकडे सोपवल्याची चर्चा आहे. केसरकर यांच्याकडे पर्यावरणाबरोबरच पर्यटन खातेही दिल्याची चर्चा आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण आणि पर्यटन खात्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. इतरवेळी पर्यावरण खाते घेण्यासाठी फारसे कुणी इच्छुक नसते. मात्र, आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंकडून पर्यावरण खाते मागून त्या खात्यात काम करण्यासाठी पुढाकार दर्शवला. ज्या खात्याकडे कुणाचे लक्ष जात नव्हते, त्या खात्याला आदित्य ठाकरे यांनी प्रतिष्ठेचे खाते केले. तेच प्रतिष्ठेचे खाते आता दीपक केसरकरांकडे दिले जाण्याची शक्यता आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -