घरमहाराष्ट्रअडीच वर्षे ज्या आमदारांमुळे मंत्रीपद भूषवले, त्यांच्याबद्दल चुकीचा उल्लेख संस्कृतीला धरून नाही...

अडीच वर्षे ज्या आमदारांमुळे मंत्रीपद भूषवले, त्यांच्याबद्दल चुकीचा उल्लेख संस्कृतीला धरून नाही – केसरकर

Subscribe

ज्या झाडाखाली तुमचं नेतृत्त्व मोठं झालं आहे, त्याच झाडातल्या पानांची सावली तुम्हाला देखील मिळालेली असणार आहे, कारण तुम्ही देखील मंत्री पद उपभोगलं आहे. त्यांच्यासाठी मतदान करणारे आमदार होते त्यांनी मनापासून त्यांच्या बाजूने त्यावेळी मतदान केले. त्यांच्यामुळे तुम्ही मंत्री झालात, अडीच वर्षे तुम्ही मंत्रीपद भूषवले, त्यामुळे त्याच आमदारांचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने करणे हे भारतीय संस्कृतीला धरून नाही. अशा शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

यावेळी केसरकर म्हणाले की, प्रत्येक पक्षाची मुळची मत असतात. त्यामुळे दिलेले चॅलेंज चुकीचे आहे, आम्ही मुळ विचारधारेबरोबर आहे त्यामुळे आम्हाला काही नाही. तुम्हाला जेव्हा आवश्यकता असते तेव्हा तुम्ही ते करा. उद्धव ठाकरेंनी मुलाखती म्हटले की, मातेश्रीची दारं सर्वांसाठी खुली आहेत, त्यांनी परत याव. तुम्ही जेव्हा परत याव म्हणतात, त्याचवेळी आमचा उल्लेख ज्याप्रकारे केला जातो तो चुकीचा आहे.

- Advertisement -

आता जे मुद्दे समोर आलेत त्यातील एका मुद्द्याला मी स्पर्श करेन, तो आहे कोरोना संदर्भातील, कोरोनासंदर्भात टीम ग्राऊंडवर काम करत असते, ग्राऊंडवर काम करणाऱ्या टीमचे नेतृत्त्व एकनाथ शिंदे यांनी केले होते. भारतातील सर्वात मोठे जम्बो कोविड सेंटर त्यांनी विक्रमी वेळात पूर्ण करून दाखवलं, आणि एकनाथ शिंदे यांनी जगात एक आदर्श निर्माण करून दाखवला, अशा शब्दात केसरकरांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या कामाचे कौतुक केले.

त्यांच्या हातून चांगल्या पद्धतीने काम घडावे, हिंदुत्वासंदर्भात त्यांच्याकडून चांगल काम घडाव अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. हिंदुत्व म्हणतो तेव्हा ती एक संस्कृती असते, ज्यादिवशी वाढदिवस असतो त्यावेळी शुभेच्छाच द्यायच्या असतात. उद्धव ठाकरेंबद्दल काही बोलणार नाही, त्यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देणार नाही, असं आधीच जाहीर केलं आहे.

- Advertisement -

केसरकरांनी उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

त्यांच्या हातून चांगल्या पद्धतीने काम घडावे, हिंदुत्वासंदर्भात त्यांच्याकडून चांगल काम घडावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. हिंदुत्व म्हणतो तेव्हा ती एक संस्कृती असते, ज्यादिवशी वाढदिवस असतो त्यावेळी शुभेच्छाच द्यायच्या असतात. उद्धव ठाकरेंबद्दल काही बोलणार नाही, त्यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देणार नाही, असं आधीच जाहीर केलं आहे. मात्र ज्यावेळी विचारधारेसंदर्भात प्रश्न येतील, वैचारिक मुद्दे येतील त्यावेळी आमचा मुद्दा वैचारिक मुद्द्यापूर्ती मर्यादित राहील. अशा शब्दात दिपक केसरकरांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महाविकास आघाडीच्या स्थापनेत राऊतांचा सिंहाचा वाटा

महाविकास आघाडी स्थापना झाली त्यामध्ये संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा होता हे कोणीही नाकारत नाही. परंतु मंत्रिमंडळाचे गठन झाले त्यावेळी राऊत नाराज होते की काय? ज्यामुळे त्यांना विसर पडतोय की आनंदाच्या प्रसंगी अशाप्रकारची मुलाखत घेतली नाही पाहिजे किंवा अशाप्रकारे प्रश्न विचारले गेले नाही पाहिजेत. ज्यातून प्रश्नातून चुकीचा मेसेज लोकांपर्यंत जाईल. असही केसरकर म्हणाले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -