Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर होता-होता राहून गेला शिंदे-राऊतांचा 'सामना'; मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाने एकच हास्यकल्लोळ

होता-होता राहून गेला शिंदे-राऊतांचा ‘सामना’; मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाने एकच हास्यकल्लोळ

Subscribe

छत्रपती संभाजीनगरमधील बैठकीनंतर महायुती सरकारची पत्रकार परिषद होणार होती. या पत्रकार परिषदेला मी पत्रकार म्हणून जाणार आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणार असे खासदार आणि संपादक संजय राऊत म्हणाले होते.

छत्रुपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे दाखवत 16 सप्टेंबर रोजी राज्यमंत्रिमंडळाने छत्रपती संभाजीनगरात बैठक घेतली. यामध्ये तब्बल 45 हजार कोटी रुपयांच्या योजनांच्या घोषणा केल्या. मात्र, ही बैठक चर्चेत राहली ती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मिश्कली टोलेबाजीने.(Shinde Rautas match went on and on A single laugh at the Chief Ministers question)

झाले असे की, छत्रपती संभाजीनगर येथे 16 सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठीकत राज्य सरकारकडून जवळपास 45 हजार कोटींच्या विकासकामांची घोषणा करण्यात आली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली.

पत्रकार म्हणून मी नक्की जाणार, प्रश्न विचारणार

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगरमधील बैठकीनंतर महायुती सरकारची पत्रकार परिषद होणार होती. या पत्रकार परिषदेला मी पत्रकार म्हणून जाणार आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणार असे खासदार आणि संपादक संजय राऊत म्हणाले होते. दरम्यान या घोषणेनंतर पासेस असलेल्या पत्रकांरानाच जाऊ दिले गेले असेही चर्चा रंगली होती.

हेही वाचा : PM MODI : अतिशय महत्त्वाची आहे विश्वकर्मा योजना, स्किल, ट्रेनिंगसह मिळणार तीन लाखांपर्यंत कर्ज

राऊत आले नाहीत का?

- Advertisement -

बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेतून घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊत आले नाहीत का? असा प्रश्न विचारत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला यावेळी उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला होता.

हेही वाचा : राष्ट्रवादीचा ‘वळू’ शेतकऱ्यांच्या शेतावर सोडू नका; ऊस प्रकरणांवरून सदाभाऊ खोत यांचा घणाघात

संजय राऊतांनाही देण्यात आली होती पास

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेठी खासदार संजय राऊत यांना देखील पास देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. त्यामुळे संजय राऊत हे खरंच मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला जाणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र संजय राऊत हे या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले नाहीत. यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी खोचक सवाल केला होता.

- Advertisment -