घरमहाराष्ट्रभाजपासोबत शिंदेंची शिवसेना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भारतरत्नासाठी आग्रही

भाजपासोबत शिंदेंची शिवसेना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भारतरत्नासाठी आग्रही

Subscribe

मुंबईः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न द्यावा यासाठी भाजपने महाराष्ट्रात सत्ता असताना दोनवेळा केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. त्यावेळी सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची सूत्रे ठाकरे कुटुंबीयांच्या हाती होती.
आता ठाकरे कुटुंबियांशिवाय शिवसेनेचा नव्याने कारभार सुरु झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेनेही सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी शिफारस करण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे जे भाजप व ठाकरेंच्या शिवसेना युतीला जमले नाही ते शिंदेंच्या नेतृत्त्वात शक्य होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा यासाठी भाजप आग्रही आहे. शिवसेना व भाजपचे सरकार असताना केंद्र सरकारकडे दोन वेळा तसा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. केंद्रात भाजपची सत्ता असूनही सावरकरांना भारतरत्न मिळाला नाही. त्यावरुन टीकाही झाली. महाराष्ट्रात व केंद्रात भाजपची सत्ता असूनही सावरकरांना भारतरत्न मिळत नाही, हे दुर्देंव आहे, असा आरोपही झाला होता. कॉंग्रेसने मात्र कायम सावरकरविरोधी भूमिका घेतली आहे. सावरकर यांना भारतरत्न देऊ नये, असा सूर कॉंग्रेसने लावला आहे. सावरकरांविरोधात वक्तव्य केल्याने कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर वारंवार टीका झाली आहे. असे असले तरी महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या भाजपच्याच प्रस्तावाला हिरवा कंदील का दाखवला जात नाही हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

- Advertisement -

शिवसेना व धनुष्यबाणाचे खरे दावेदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थक असल्याचा निकाल नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. हा निकाल जाहिर झाल्यानंतर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची पहिली बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्य नेते पदी निवड झाली. तसेच अनेक ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आले. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. या ठरावाने सावरकर यांना भारतरत्न देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मात्र महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा या अशी शिफारस चार वेळा महाराष्ट्रातून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली आहे. या मागणीसाठी मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेना पाठपुरावा करणार का याकडे सर्वोंचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातून भारतरत्नसाठी झालेल्या शिफारशी

महात्मा जोतिबा फुले
१) सन २०००
२) १६ जून २०२५
३) ५ ऑगस्ट २०१६
४) १३ ऑगस्ट २०१८

सावित्रीबाई फुले
१) सन २०००
२) १६ जून २०२५
३) ५ ऑगस्ट २०१६
४) १३ ऑगस्ट २०१८

स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
१) २० ऑगस्ट २०१८
२) १७ जानेवारी २०१९

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
१) ८ ऑक्टोबर २०१२

अण्णाभाऊ साठे
२१ सप्टेंबर २०१०

यशवंतराव चव्हाण
सन २०१२

डॉ. पंजाबराव देशमुख
१८ ऑगस्ट २०१६

सचिन तेंडूलकर
२० ऑगस्ट २०११

दादासाहेब फाळके
सन २०१३

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -