Homeमहाराष्ट्रकोकणBharat Gogawale : सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, भरत गोगावलेंचा हल्लाबोल

Bharat Gogawale : सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, भरत गोगावलेंचा हल्लाबोल

Subscribe

Gogawale Vs Tatkare : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून तटकरे आणि गोगावले यांच्यात वाद सुरू आहे.

पालकमंत्रिपदावरून अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना नाराज झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाशिक आणि शिवसेनेला रायगड न मिळाल्यानं दोन्ही पक्षानं खदखद व्यक्त केली होती. यानंतर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या निवडीला स्थगिती देण्यात आली होती. नाशिकसाठी माणिकराव कोकाटे आणि रायगडमधून भरत गोगावले इच्छुक आहेत. यातच गोगावले यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

सुनील तटकरे यांच्या आमच्या पाठीत पुन्हा एकदा खंजीर खुपसला आहे. जे स्वत:च्या भावाचे होऊ शकले नाहीत. ते तुमचे आमचे काय होणार? असा सवाल उपस्थित करत गोगावलेंनी हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा : पत्नी रक्ताच्या थारोळ्यात, खुर्चीवर चिमुकला बसलेला; हत्येनंतर पती म्हणाला –

भरत गोगावले म्हणाले, “आम्ही व्यवहाराने चालणारे आहोत. आमचं काम प्रामाणिक आहे. आम्ही चुकीचे काही करत नही. सुनील तटकरेंनी विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे आमचं काम केले असते, तर आम्ही पालकमंत्रिपदाबाबत विचार केला असता. पण, तटकरेंनी आमचं काम केलं नाही.”

“तटकरेंनी आमच्या पाठीत पुन्हा खंजीर खुपसला. जे स्वत:च्या भावाचे होऊ शकले नाहीत. ते तुमचे-आमचे काय होणार?” असा प्रश्न गोगावलेंनी उपस्थित केला आहे.

झेंडावंदन तटकरे अन् महाजन करणार…

महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद उफाळला आहे. तरी, सरकारनं रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती दिली आहे. मात्र, त्यानंतर दोन्ही ठिकाणी स्थगितीपूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या मंत्र्यांनाच झेंडावंदनाचा मान मिळणार आहे. याबाबत राज्य सरकारनं एक परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी ( 26 जानेवारी ) नाशिक येथे मंत्री गिरीश महाजन आणि रायगड येथे आदिती तटकरे झेंडावंदन करतील, असं परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

हेही वाचा : शरद पवारांजवळील तुमची आसनव्यवस्था का बदलली? अजितदादांच्या उत्तरानं हशा पिकला