शिंदे समर्थक खासदारांच्या सुरक्षेत वाढ; घर, कार्यालयाबाहेर 24 तास शस्त्रधारी पोलीस तैनात

शिवसेना खासदारचा एक मोठा गट शिंदे गटात सामील होण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटात सामील होणाऱ्या खासदारांच्या सुरक्षेत मोठ्याप्रमाणात वाढ करण्यात आली आहे

shinde supporter shivsena mp hemant godse krupal tumane homes and offices outside police security

शिवसेनेच्या 2 डझनहून अधिक आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. तर मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांनी पाय उतार व्हावे लागले. यानंतर बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठींब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत सहभागी होणाऱ्या आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांचा ओघ वाढत आहे. अशात आता खासदारचा एक मोठा गट शिंदे गटात सामील होण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटात सामील होणाऱ्या खासदारांच्या सुरक्षेत मोठ्याप्रमाणात वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा : शरद पवारांनी डाव साधला आणि शिवसेना फोडली, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर नागपूरचे खासदार कृपाल तुमाने यांच्या कार्यालय आणि घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटात सामील होणाऱ्या संभाव्य खासदारांना सुरक्षा पुरवली जात आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेमंत गोडसेंच्या कार्यालय आणि घराबाहेर चोख पोलीस बंदोबस्त

नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर मोठ्याप्रमाणात पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. काल रात्रीपासून अचानक हा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यानुसार हेमंत गोडसे यांच्या घर आणि निवासस्थानाबाहेर 24 तास शस्त्रधारी पोलीस तैनात आहेत. यात नाशिक पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांचा समावेश आहे. हेमंत गोडसे यांच्या कार्यालयापासून शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय जवळचं आहे. अशात खासदार हेमंत गोडसे शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांनंतर ही सुरक्षा पुरवली जात असल्याचे म्हटले जातेय. त्यामुळे ही सुरक्षा प्रदान करण्यात आल्याचे म्हटले जातेय.

हेही वाचा : एकनाथ शिंदेंचे शिवसेनेला संघटनात्मक आव्हान; संघटना आणि चिन्ह ताब्यात घेण्याची खेळी

नागपुरातील कृपाल तुमानेंच्या सुरक्षेत वाढ

आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदारही बंड करण्याच्या तयारीत आहेत. हे खासदार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवसेना खासदारांच्या घर आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात नागपुर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या घर आणि कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खासदार कृपाल तुमाने यांच्या घर आणि कार्यालयासमोर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

हेही वाचा : शिंदे गट भाजपप्रणीत एनडीएत सहभागी होणार? मुख्यमंत्री मोदींची भेट घेणार

दरम्यान शिवसेनेचे राहुल शेवाळे, भावना गवळी, कृपाल तुमने, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, प्रतापराव जाधव, धर्यशिल माने, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलिक, श्रीरंग बारणे असे बारा खासदार शिंदे गटात सामील होण्याच्या तयारीत आहेत. हे खासदार लवकरचं शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे.


लोकसभेतही शिवसेनेत फुट; राहुल शेवाळेंना गटनेता करण्यासाठी ‘शिंदे’ खासदारांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र