घरमहाराष्ट्र'हे' खातं आवडतं नाही, तरी करतोय काम'; शिंदेंच्या 'या' मंत्र्याने व्यक्त केली...

‘हे’ खातं आवडतं नाही, तरी करतोय काम’; शिंदेंच्या ‘या’ मंत्र्याने व्यक्त केली नाराजी

Subscribe

तब्बल आठ ते नऊ महिन्यांपूर्वी राज्यात राजकीय भूकंप घडला आणि नव्याने शिंदे-फडणवीस यांच्या हाती राज्याचा कारभार आला. सध्या तरी या सरकारमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचेच दिसून येत आहे.

मागील वर्षाच्या जून महिन्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाड झाला आणि एकनाथ शिंदे यांच्या महाविकास आघाडीमधील समर्थक आमदारांनी आणि खासदारांनी बंड केले. ज्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना झाली. या सरकारमध्ये सध्या तरी सर्व काही सुरळीत सुरू असल्याचेच दिसून येत आहे. पण यांतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही मंत्री हे त्यांना देण्यात आलेल्या खात्यामुळे खूश नसल्याचे सांगण्यात आले आहे. पण याबाबत अद्यापही कोणत्याही नेत्याने सरळसरळ नाराजी व्यक्त केलेली नाही, पण आता शिंदे यांच्या गटातील एक मंत्री त्यांना देण्यात आलेल्या खात्यामुळे नाराज असल्याचे उघड झाले आहे. हे मंत्री दुसरे-तिसरे कोणी नसून आरोग्यमंत्री तानाजी सावंत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे बरेच गौप्यस्फोट करताना दिसून येत आहेत. अशातच आता त्यांनी पुन्हा एकदा आणखी माहिती उघड केली आहे. सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मिळालेले आरोग्य खाते त्यांना पसंत नव्हते, असे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता विविध चर्चा रंगू लागल्या आहेत आणि म्हणूनच शिंदेंच्या मंत्रिमंडळातील अनेकजण नाराज असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर मला आरोग्य खाते देण्यात आले. पण आपल्याला आरोग्य खातं पसंत नव्हते. मी नाराज होतो, तरीही सेवाभावी वृत्तीने काम करतोय. परंतु आता हे खाते आवडू लागले आहे, असे तानाजी सावंत यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मिळावे, अशी इच्छा देखील सावंत यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यात बऱ्याचदा तानाजी सावंत हे आपल्या विधानांमुळे चर्चेत आलेले आहेत. आता पुन्हा ते वेगवेगळी विधाने करत असल्याने राजकारणात सर्वांच्या भुवया उंचावू लागल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर आणि मविआमध्ये जागा वाटप झाल्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यामध्ये तब्बल 150-200 बैठका झाल्याचा गौप्यस्फोट केला.

- Advertisement -

हेही वाचा – ठाकरे पुन्हा अडचणीत? पालघर साधु हत्या प्रकरण CBIकडे देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -