शिर्डी राज्यातील सर्वाधिक स्वच्छ तिर्थक्षेत्र, तर ‘हे’ शहर दुसऱ्या क्रमांकावर

Shirdi is the cleanest pilgrimage site in the state

राज्यात माझी वसुंधरा अभियाना अतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शिर्डी सलग दुसऱ्यांदा अव्वल ठरले आहे. माझी बसुंधरा अभियानात शिर्डीला प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर दुरऱ्या क्रमांकावर पंढरपूर आहे. शिर्डीला 3 कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. या पुरस्काराचे ग्रामस्थांसह भक्तांनी स्वागत केले आहे.

देशभरातून लाखो भाविक दरवर्षी शिर्डीत हजेरी लावतात. त्यामुळे शिर्डीतील स्वच्छता हे नगरपंचायत समोरील मोठे आव्हान आहे. तरी देखील सलग दुसऱ्या वर्षी शिर्डी नगरपंचायतने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला असून याविषयी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी अधिक महिती दिली आहे.

स्वच्छ मंदिर सर्व्हेची यादी –

शिर्डी
पंढरपूर
शेगाव
त्र्यंबकेश्वर
कोल्हापूर
जेजुरी

साई संस्थानच्या मतदीने केले काम –

यावेळी शिर्डी नगरपंचायतला सलग दुसऱ्या वर्षी 3 कोटींचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. राज्यातील देवस्थानच्या यादीत शिर्डीने अव्वल क्रमांक पटकावला आहे. शिर्डी साई संस्थानच्या मदतीने केलेले काम इतर देवस्थानने केले तर राज्य स्वच्छ अभियानात देशात पहिल्या क्रमांकावर असले यात शंका नाही, असे माजी नगरसेवक सुजय गोंदकर म्हणाले.

काय आहे माझी वसुंधार सन्मान –

महाराष्ट्र शासनाद्वारे माझी वसुंधरा 2.0 अभियान अंतर्गत आयोजित निसर्गातील पंचतत्वांवर आधारीत स्पर्धा घेण्यात आली होती. या माझी वसुंधरा अभियानांतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर स्पर्धेमध्ये मूल्यमापन करण्यात आले. हा सन्मान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या हस्ते देण्यात आला.