Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश शिरीन पाठारे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, हा गौरव प्राप्त करणारे एकमेव मराठी अधिकारी

शिरीन पाठारे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, हा गौरव प्राप्त करणारे एकमेव मराठी अधिकारी

Subscribe

मुंबई : एअर इंडियामध्ये 31 वर्षांपासून विमान वाहतूक सुरक्षाविषयक महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे शिरिन शरद पाठारे यांना ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीकडून (BCAS) महासंचालक बीसीएएस कमेंडेशन डिस्क या राष्ट्रीय सर्टिफिकेशनने गौरवण्यात आले आहे. गुणवत्तापूर्ण सुरक्षा मानकांची अंमलबजावणी आणि सुरक्षा प्रशिक्षण कार्यातील गुणवत्तापूर्ण योगदान यासाठी पठारे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. असा पुरस्कार मिळवणारे ते यावर्षीचे एकमेव मराठी अधिकारी आहेत.

हेही वाचा – अंबानी ग्रुपचे ठरलं: Jio Air fiber लॉंच होणार गणेश चतुर्थीला; मुकेश अंबानींची घोषणा

- Advertisement -

शिरीन पाठारे हे मार्च 2021पासून श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षाप्रमुख म्हणून जोखमीची जबाबदारी पार पाडत आहेत. भारतीय सैन्य दलाप्रमाणेच देशाच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या BCASमध्ये शिरिन पाठारे हे गेली 31 वर्षं जोखमीच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. BCASचे निरीक्षक आणि परीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पाठारे एक निष्णात एव्हिएशन सिक्युरिटी मॅनेजमेंट स्ट्रॅटेजिस्ट म्हणूनही सिव्हिल एव्हिएशन क्षेत्रात परिचित आहेत. श्रीनगरमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतानाच ते तेथील ड्रॉपगेट या अतिसंवेदनशील गेटवर तैनात CRPF जवानांना प्रशिक्षण देण्याचे कामही करत आहेत.

हवाई वाहतुकीचा संबंध नागरी वाहतुकीशी येतो, तसाच तो लष्करी वाहतुकीशी देखील येतो. पाठारे यांनी काबूल, अफगाणिस्तान आणि श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) यासारख्या जगातील अतिसंवेदनशील विमानतळांसह अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. विमान वाहतुकीतील सुरक्षाविषयक संभाव्य धोके टाळण्यासाठी त्यांनी अनेक सुरक्षा ऑडिट्स, तपासण्या आणि जागरुकता कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भारत चंद्रावर पोहचला अन् पाकिस्तानाच्या मदरशातील विद्यार्थी सांगतात, पृथ्वी….; व्हिडीओ व्हायरल

कार्गो आणि हायप्रोफाइल व्हीआयपींच्या सुरक्षेवर देखरेख ठेवण्याचाही त्यांना दीर्घ अनुभव आहे. शिरीन पाठारे यांनी देशाच्या विमान वाहतूक सुरक्षाविषयक क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे हे क्षेत्र अधिक गुणवत्तापूर्ण आणि अत्याधुनिक होण्यास मदत झाली आहे.

BCAS Officers and Officials तसेच Other agencies officers and Officials या दोन विभागांत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. डिस्क आणि प्रमाणपत्र असे दोन पुरस्कार असतात. पाठारे यांना Other agencies officers and Officialsमध्ये हा पुरस्कार मिळाला आहे. ते यातील एकमेव मराठी अधिकारी आहेत (यात एकूण 55 नावे आहेत. त्यापैकी 15 डिस्क आणि 40 प्रमाणपत्र). पाठारे यांना हा पुरस्कार स्वातंत्र्यदिनी जाहीर करण्यात आला असून पुरस्कारवितरण सोहळा नंतर आयोजित करण्यात येणार आहे.

- Advertisment -