पुणे : बंडानंतर अजित पवार पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. मात्र त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या लढत होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून अढळराव पाटील यांना विजयी करण्याची राज्याचे सहकार मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आहे. मात्र त्यांना आठवड्यापूर्वीच दुखापत झाल्याने अढळरावांचा प्रचार कसा करायचा असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. (Shirur Lok Sabha Constituency Dilip Valse Patil does not support Shivajirao Adalrao Patils campaign Cause of injured hand)
हेही वाचा – Satara News: पोहण्यासाठी गेलेल्या 3 मुली बुडाल्या; दोघींचा मृत्यू तर एकीला वाचवण्यात यश
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यासह स्थानिक आमदारांनी अढळरावांना पक्षात घेण्यास तीव्र विरोध केला होता. असे असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीप मोहिते यांची समजूत घालत अढळरावांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला आणि त्यांना शिरूर लोकसभेची जागाही दिली. यानंतर दिलीप मोहिते पाटील यांनीही वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अढळरावांचा प्रचार करू, अशी भूमिका घेतली.
वीस वर्षांनी अढळरावांची घरवापसी झाल्याने वळसे पाटील आणि त्यांचे मैत्र पुन्हा बहरत होते. मात्र दिलीप वळसे पाटील यांनी दुखापत झाली. दिलीप वळसे पाटील यांच्या खुब्याला मार लागला असून हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते अढळरावांच्या प्रचारापासूनही दूर आहेत. अढळरावांच्या प्रचाराची सारी मदार आणि शिरूर लोकसभेच्या जागेची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असल्याने त्यांच्याशिवाय प्रचार कसा करायचा, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रसेच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. दिलीप वळसे पाटील प्रचारात सक्रिय नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही प्रचारापासून लांबच आहेत. त्यामुळे अढळरावांना स्वत:ची यंत्रणा राबवावी लागत आहे.
हेही वाचा – LPG Price Rate: मोठा दिलासा! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात
अढळरावांच्या प्रचाराचा अजित पवारांसमोर प्रश्न?
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधताना अजित पवार म्हणाले होते की, एका सदाराला मी उमेदवारी दिली. त्याला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटल यांनी जीवाचे रान केले. ते उत्तम वक्ते आहेत, उत्तम कलाकार आहेत. त्यांनी संभाजी महाराजांची भूमिका उत्तम साकारली होती. महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या भूमिकेने खिळवून ठेवले होते. पण त्यांचे मधल्या काळात मतदारसंघात लक्ष नव्हते, ते मतदारसंघात फिरत नव्हते. पण काळजी करू नका, त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार मी निवडून आणून दाखवेन, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला होता. मात्र आता दिलीप वळसे पाटील यांच्या दुखण्याने अढळरावांचा प्रचार शिरूर मतदारसंघात कसा होणार? हे पाहावे लागेल.