घर उत्तर महाराष्ट्र नाशिकमध्ये शिवभक्त आक्रमक; कर्नाटकात शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने झाले संतप्त

नाशिकमध्ये शिवभक्त आक्रमक; कर्नाटकात शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने झाले संतप्त

Subscribe

नाशिक : कर्नाटक राज्यातील बागलकोट येथे अनधिकृत जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब राजवाडे यांच्या नेतृत्वाखाली पंचवटी कारंजा येथे कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयकाराच्या घोषणा देण्यात आल्या.

कर्नाटक राज्यातील बागलकोट शहरात अनधिकृत जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याचे सांगत येथील जिल्हाधिकार्‍यांनी रातोरात जेसीबीच्या सहाय्याने पुतळा हटविण्याचे काम केले. यावेळी स्थानिक नागरिकांनी याला कडाडून विरोध केल्याने पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. यावर स्थानिकांनी कर्नाटक सरकारचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला होता. कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याचे पडसाद नाशिक मध्ये उमटले असून, पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब राजवाडे यांच्या नेतृत्वाखाली पंचवटी कारंजा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनावेळी हर्षद पटेल, प्रकाश गवळी, बाबासाहेब बढे, लखन पवार, योगेश पवार, संदीप जाधव, राहुल कुलकर्णी, किरण काळे, उल्हास धनवटे, सचिन पवार, मनोज जाधव, अमित खांदवे, योगेश कापसे, राजेश कदम, सतनाम राजपूत, तुषार नाटकर, कुणाल सराफ, प्रवीण जाधव, विकी जट, विलास आव्हाड, विशाल देशमुख, हेमंत देवरे, शिवा गुंडे, योगेश घोडके आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरात लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. यावेळी पंंचवटी पोलीस स्टेशनमध्ये या आंदोलकांवर पोलीस नाईक अभिजित पैठणकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -