
शिवजयंतीनिमित्त राज्य सरकारकडून शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला आहे. या भव्य सोहळ्यात अनेक शिवप्रेमींनी उपस्थिती दर्शवली आहे. दरम्यान यानंतर पोलीस पथकाकडूनही छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. याशिवाय महाराष्ट्रातील पारंपारिक वाद्य ढोल-ताशा आणि लेझीमची प्रात्यक्षिके दाखवत राजांना मानवंदना अर्पण करण्यात आली आहे. त्यामुळे शिवनेरी गडावर मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या सोहळ्यानिमित्त शिवनेरी गड आकर्षक रांगोळ्या आणि फुलांनी सजवण्यात आला आहे. संपूर्ण परिसर जय शिवाजी जय भवानीच्या घोषणांनी दुमदुमून गेला आहे. राज्यभरात आज शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत असून शिवजयंतीचा एक उत्साह पाहायला मिळतोय.
Maharashtra Deputy CM Ajit Pawar, ministers Aaditya Thackeray & Dilip Walse Patil, and other leaders participate in the celebrations on the occasion of #ChhatrapatiShivajiMaharaj Jayanti. Visuals from Shivneri Fort, Junnar in Pune district.
(Source: District Information Office) pic.twitter.com/v5gRdzeQQz
— ANI (@ANI) February 19, 2022
दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवरायांना वंदन करतानाचा एक फोटा पोस्ट करत त्यांना अभिवादन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे .सत्य आणि न्याय या मूल्यांशी त्यांनी तडजोड केली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. pic.twitter.com/alPjOrLdT4
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2022
दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्लावर अनेक शिवप्रेमी जमत असतात, राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवज्योत घेऊन शिवभक्त शिवनेरी किल्लावर येतात. मात्र कोरोनामुळे सर्व खबरदारी घेत यंदाही काही मोजक्या लोकांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे.
महाराजांच्या जीवनातला कुठलाही प्रसंग, त्यांच्या कुठल्याही निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर, त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय स्वराज्याचं हित, जनतेचं कल्याण डोळ्यासमोर ठेवून, दूरदृष्टीनं घेतला होता, हे आपल्या लक्षात येईल.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 19, 2022
मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवजयंतीचा उत्साह
शिवजयंतीच्या सोहळ्या निमित्ताने दादर येथील शिवाजी पार्कातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत हे उपस्थित होते.
Shiv Jayanti 2022 : औरंगाबादच्या क्रांती चौकात शिवरायांच्या देशातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण