घरमहाराष्ट्रशिवप्रताप दिन! मराठी माणसाच्या धमन्यांमध्ये चैतन्य भरवणारा दिवस; उदयनराजेंचं ट्वीट

शिवप्रताप दिन! मराठी माणसाच्या धमन्यांमध्ये चैतन्य भरवणारा दिवस; उदयनराजेंचं ट्वीट

Subscribe

प्रत्येक मावळयाचं रक्त सळसळून निघेल अशी ऐतिहासिक घटना 10 नोव्हेंबर 1659 रोजी घडली. स्वराज्यावर वाकडी नजर ठेवून चाल करून आलेल्या आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला.

मुंबई: प्रत्येक मावळयाचं रक्त सळसळून निघेल अशी ऐतिहासिक घटना 10 नोव्हेंबर 1659 रोजी घडली. स्वराज्यावर वाकडी नजर ठेवून चाल करून आलेल्या आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला. हा दिवस इतिहासामध्ये सोनेरी अक्षराने लिहावा असा आहे. आजही अफजलखानाचा वध हा प्रसंग आठवला तरी अंगावर काटा आल्याखेरीज राहणार नाही. या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. (Shiv Pratap Day A day that invigorates the veins of Marathi people Udayanraje Bhonsle tweet)

या शिवप्रताप दिनाची आठवण करुन देत, छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एक ट्वीट केलं आहे. हर हर महादेव..! शिवप्रताप दिन. प्रतापगडाच्या पायथ्याशी आजच्याच दिवशी 10 नोव्हेंबर 1659 मध्ये छत्रपती शिवरायांनी बलाढ्य अफझलखानाचा वध केला होता. 364 वर्षांनंतरही प्रत्येक मराठी माणसाच्या धमन्यांमध्ये चैतन्य भरणाऱ्या शिवछत्रपतींच्या शौर्याला मानाचा मुजरा!, असं ट्वीट उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

- Advertisement -

असा काढला शिवरायांनी अफझलखानाचा कोतळा

उंच आणि शक्तिशाली धिपाड अशा अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बौद्धिकचातुर्याने ठार मारेल. त्यावेळी बिजापूरचा राजा अदिलशहा होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बिजापूरच्या सर्व क्षेत्रावर अधिपत्य मिळवले होते.

- Advertisement -

तसंच, अफझलखानाने शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजांची हत्या केली होती आणि आदिलशाही दरबारात त्याचे व शहाजी राजांचे वैर होते. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून अफझलखान मोठे सैन्य घेऊन विजापूरहून 1659 साली निघाला. अफझलखानाच्या सैन्यात सिद्धी हिलाल, मुसाखान, अंबरखान, याकूतखान तसंच प्रतापराव मोरे, पिलाजी मोहिते हे मोठं मोठे पराक्रमी सरदार होते. तसंच, बारा हजार घोडदळ, दहा हजार पायदळ, अनेक तोफा व बंदूकधारी सैनिकसुद्धा होते.

खान हिंदूंवर अनंत अत्याचार करत हिंदू मंदिरं उद्ध्वस्त करत वाई येथे मुक्कामाला राहिला. अफझल खान हा आधी वाईचा सुभेदार होता त्याला तिथला सगळा परिसर ज्ञात होता म्हणून त्याने शिवाजी महाराजांचा तिथे वध करण्याचा निर्णय घेतला.

खानाने महाराजांना वाईला भेटायला बोलावले. परंतु महाराजांनी वाईस जाण्यास नकार दिला कारण घातपात होण्याची दाट शक्यता होती. म्हणून महाराजांनी आपण फारच घाबरलो असल्याचं भासवत खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट घेण्यास सांगितलं. खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण्यास तयार झाला.

भेटीदरम्यान दोन्ही पक्ष कुठलेही हत्यार वापरणार नाही असा नियम ठरला. प्रत्येक पक्षाचे 10 अंगरक्षक असतील आणि त्यातील एक शामियान्याच्या बाहेर थांबेल व इतर अंगरक्षक लांब राहतील असे ठरले.

भेटीचा दिवस 10 नोव्हेंबर 1659 हा ठरला.

भेटीच्या दिवशी अफझलखान भेटीच्या वेळेआधीच शामियान्यात आला. शिवाजी महाराजांनी जाणूनबुजून अतिशय भव्य आणि सुंदर शामियाना तयार करवून घेतला होता. नि:शस्त्र भेटायचं ठरलं होते तरीही खानाने दगा करण्याचे ठरवले असल्याने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता.

खान 100 टक्के दगाफटका करणार हे महाराजांना ठाऊक असल्याने त्यांनी अंगरख्याखाली चिलखत घातले होते आणि वाघनखे हातात लपवली होती. महाराज शामियानात आल्यानंतर अफझलखानाने महाराजांना आलिंगन देण्यास बोलावले.

उंच धिप्पाड अफझलखान आणि मूर्ती लहान पण महान कीर्ति असलेले महाराज आलिंगन देण्यास सरसावले. धिप्पाड अफझलखानाने महाराजांना आलिंगन देताच आपल्या काखेत दाबून महाराजांवर बिचव्याचा वार केला.

परंतु महाराजांनी चिलखत घातलेलं असल्याने त्यांना काहीही इजा झाली नाही आणि खानाने दगा केल्याने महाराजांनी वाघनखं काढली आणि खानाच्या पोटात खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढला.

(हेही वाचा: शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाचा निर्णय होईल? उज्ज्वल निकम यांचे सूचक वक्तव्य )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -