घरमहाराष्ट्रपावनखिंडीत दारू पिणाऱ्यांना 'शिवराष्ट्र संघटने'कडून चोप

पावनखिंडीत दारू पिणाऱ्यांना ‘शिवराष्ट्र संघटने’कडून चोप

Subscribe

पावनखिंडीवरची सुरक्षा वाढवण्याची मागणी

कोल्हापुर येथील पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेत सहभागी झालेल्या काही तरूणांनी पन्हाळा आणि पावनखिंडच्या आवारातच दारू प्यायल्याचा प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या मद्यपी तरूणांना चांगलाच दणका दिला आहे.

- Advertisement -

१३ जून ते १५ जुलै या कालावधी दरम्यान पावनखिंड पदभ्रमंती मोहीम आयोजित करण्यात आली होती. ही मोहिम पन्हाळा गडावरील इतिहासातील स्फूर्तीदायी तसेच प्रेरणादायी घडलेल्या घटनेच्या आठवणी जतन करण्यासाठी नेहमी निघत असते.

असा घडला प्रकार

पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेमध्ये सहभागी झालेले हे तरुण पन्हाळा आणि पावनखिंड परिसरात कारमध्ये बसून दारु पित होते. हा प्रकार  शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन तरुणांना चांगलाच चोप दिला. यावेळी, पन्हाळा आणि पावनखिंड भागातील परिसरात दारु पिणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवराष्ट्रच्या कार्यकर्त्यांनी केली असून हा संपुर्ण परिसर पोलीस बंदोबस्त असावा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -