जयसिंगपुरात शिवसैनिक आणि मंत्री यड्रावकर गटात झटापट, परिसरात तणावाचं वातावरण

Shiv Sainik and Minister Yadravkar group clash in Jaisingpur

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडात सामील झालेल्या शिवसेच्या आमदारांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरून आदोलन करत आहेत. कोल्हापुरातील शिरोळमधून अपक्ष आमदार आणि मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याविरोधात शिवसेने आंदोलन केले. यड्रावकर बंडखोर शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसैनिकांनी जयसिंगपूर येथील त्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी यड्रावकरांचे समर्थक आणि शिवसैनिक समोरासमोर आले. यावेळी काही काळ तणाव निर्माणा झाला होता.

पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की –

यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली. मंत्री यड्रावकरांचे समर्थक एकवटले होते. या सर्व समर्थकांचा बंडखो शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. यड्रावकरांच्या कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

परिसरात तणाव –

पोलिसांनी लावलेले बॅरिकेट काढून टाकत शिवसैनिक कार्यालयात घुसले. यड्रावकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये व शिवसैनिकांमध्ये यावेळी झटापट झाली. यड्रावकरांच्या नावाचा बोर्ड शिनसैनिकांनी काढून टाकल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. दोन्ही गट एकमेकांना भिडल्याने पोलीस कुमक कमी पडल्याचे दिसले.