Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी आपणच हा मुद्दा उपस्थित करायला हवा होता, राज ठाकरेंना शिवसैनिकांचाही पाठिंबा

आपणच हा मुद्दा उपस्थित करायला हवा होता, राज ठाकरेंना शिवसैनिकांचाही पाठिंबा

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात दिलेल्या अल्टिमेटमनंतर राज्यात तणावाचं वातावरण सुरू आहे. मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणार असल्याचा इशारा राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिला होता. मात्र, राज ठाकरे यांच्याऐवजी आपणच हा मुद्दा उपस्थित करायला हवा होता, असं म्हणत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या भुमिकेला पाठिंबा दिल्याचे दिसून आले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अनेक जुने शिवसैनिक राज ठाकरेंशी सहमत आहेत. राज ठाकरेंनी मशिदींवरून लाऊडस्पीकर खाली उतरवणे आणि रस्त्यावर नमाज अदा करण्यापासून रोखण्याची मागणी केली आहे. यापूर्वी हे मुद्दे स्वत: बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थित केले होते. त्यामुळे आता शिवसैनिकांना राज ठाकरेंच्या भूमिकेशी असहमत दर्शवणे कठीण जात आहे.

- Advertisement -

राज्याच्या महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेनेसमोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपण यासाठी असहमत कसे होऊ शकता?, बाळासाहेब नेहमीच याच मुद्द्यावर ठाम राहिले आहेत. राज ठाकरे यांच्याऐवजी आपणच हा मुद्दा उपस्थित करायला हवा होता, असं मुंबईतील माजी शाखाप्रमुख म्हणाले. त्यामुळे राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेला आमचा ९९ टक्के पाठिंबा असल्याचा दावा काही सेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील केला आहे.

राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला होता. एका कार्यक्रमादरम्यान बाळासाहेब ठाकरे मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याबाबत बोलत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे ऐकणार की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ऐकणार, असा सवालही उपस्थित केला होता.

- Advertisement -

दरम्यान, मनसेने घेतलेल्या पवित्र्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरात कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरूवात केली होती. मात्र, त्यानंतर राज ठाकरेंनी काल पत्रकार परिषद घेतली असता जोपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन हे असचं सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. याचाच अर्थ राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.


हेही वाचा : दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी, भरती सुरू


 

- Advertisment -