घरताज्या घडामोडीवाशिम दौऱ्यादरम्यान किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांकडून दगडफेक

वाशिम दौऱ्यादरम्यान किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांकडून दगडफेक

Subscribe

शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavna Gavali) यांच्या समर्थकांकडून त्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत दगड आणि शाई फेक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

भाजप खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज वाशिम दौऱ्यावर होते. वाशिमला जात असताना त्यांच्या ताफ्यावर दगडफेक आणि शाई फेक करण्यात आली. ही दगडफेक शिवसैनिकांकडून करण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. आज दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास किरीट सोमय्या यांनी ट्विटच्या माध्यामातून या घटनेची माहिती देत शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavna Gavali) यांच्या समर्थकांकडून त्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत दगड आणि शाई फेक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. (Shiv Sainiks throw stones at bjp leader Kirit Somaiya convoy during Washim tour)  शिवसैनिकांनी माझ्या गाडीवर दगड फेक केल्याचा आरोप करत किरीट सोमय्या यांनी शिवसैनिकांना गुंड असे देखील म्हटले आहे. गाडीवर दगड फेक झाल्यानंतर किरीट सोमय्या घटनास्थळी न थांबता तिथून निघून गेले. दगडफेक केल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

- Advertisement -

किरीट सोमय्या यांनी काल ट्विट करत उद्या म्हणजे २० ऑगस्ट रोजी शिवसेना खासदार भावना गवळी आणि समूहाचा १०० कोटींचा घोटाळा उघड करण्यासाठी आणि त्याचा पाठपुरवठा करण्यासाठी वाशिमला भेट देत आहे,असे म्हटले होते. त्यानुसार आज ते वाशिम दौऱ्यावर निघाले असताना वाशिम बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याजवळ त्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत दगड फेक आणि शाई फेक करण्यात आली असे किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटले आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे किरीट सोमय्या हे ठरलेल्या नियोजनानुसार सकाळी वाशिमला पोहचल्याचे ट्विट देखील केले होते. सकाळी वाशिमला पोहचलो. शिवसेना खासदार भावना गवळी ग्रुपचे १०० कोटीचे घोटाळे, हायवे कॉन्ट्रॅक्ट अडथळे, प्रायव्हेट कंपन्या, बँका, पोलीस स्टेशला भेट देणार असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.


हेही वाचा – समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू तर ३ जखमी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -