घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकत नाही, फक्त शिवसैनिकांचे आवाज ऐकतो- आदित्य ठाकरे

मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकत नाही, फक्त शिवसैनिकांचे आवाज ऐकतो- आदित्य ठाकरे

Subscribe

मी मुख्यमंत्र्याचे भाषण ऐकत नाही, मी शिवसैनिकांचा आवाज ऐकतोय आणि शिवसैनिकांचे आवाज आम्हाला प्रत्येक ठिकाणी आधी पण येत होते, आणि आता पण येत आहेत. प्रत्येक शिवसैनिकांचा आवाज उद्धव साहेबांच्यामागे खंबीरपणे आहेत, असं शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. मला वाटतं त्यांनी स्वतः आरशात बघून बोलायला हव, अशा शब्दात त्यांनी बंडखोर आमदारांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार

आम्ही कॉन्फिडंट आहोत. जे पळून गेलेत ते जर निवडणुकीमध्ये मिळाले आणि मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही तयार आहोत. ही शक्यता आहे की, महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागतील. असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. गेल्या दोन अडीच वर्षात जे काय चांगलं काम झालं, ते लोकांसमोर आहे. आम्ही काही बोललो नाही, आपली काम लोकांसमोर आहेत, असही आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

मला वाटतं कोणाच्या खास प्रेमाची मला गरज नाही, आमचा अधिकृत व्हीप आहे न्यायप्रविष्ठ गोष्टी असतील तर आमचा व्हीप महत्त्वाचा ठरणार आहे, असं शिवसेनेचे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. शिवसैनिकांसोबत जे एकनिष्ठ आमदार राहिलेले आहेत आम्ही त्यांच्यासोबत राहू, असा विश्वासही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.


उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला चार बडवे त्यांनीच..,रमेश बोरणारेंचा आरोप


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -