घरताज्या घडामोडीkudal nagar panchayat election 2022 : सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये राणेंना मोठा धक्का, शिवसेना,...

kudal nagar panchayat election 2022 : सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये राणेंना मोठा धक्का, शिवसेना, कॉंग्रेसला मताधिक्य

Subscribe

सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. कुडाळ नगपंचायतीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसला मताधिक्य मिळालं असून नारायण राणेंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ७ जागा आणि काँग्रेस २ जागा असं मिळून आघाडीने ९ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपने ८ जागांवर मुसंडी मारली आहे.

कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल

शिवसेना – ७ जागेवर विजय
काँग्रेस – २ जागेवर विजय
भाजप – ८ जागेवर विजय

- Advertisement -

कुडाळ नगरपंचायतीमध्ये राणेंना जरी धक्का बसला असला तरी वैभववाडीत नितेश राणेंनी गड राखला आहे. वैभववाडी नगरपंचायतीमध्ये भाजप २ जागांवर तर शिवसेना १ जागेवर विजयी झाली आहे. त्यामुळे नितेश राणेंनी एकहाती सत्ता मिळवत विजय मिळवला आहे. वैभववाडी नगरपंचायत निवडुकीमध्ये भाजपला यश मिळालं असून शिवसेनेचा धुव्वा उडवला आहे. तसेच देवगडमध्ये भाजपला सत्ता राखण्यात यश मिळालं आहे.

दोडामार्ग नगरपंचायतीवर भाजपने सत्ता मिळवली असून १७ पैकी १३ जागांवर भाजपने जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे शिवसेना नेते दीपक केसरकर यांना जबर धक्का बसला आहे. तर रायगडच्या पोलादपूरमध्ये शिवसेनेने भगवा फडकवला असून भाजपला धक्का दिला आहे.

- Advertisement -

रायगडच्या पोलादपूरवर शिवसेनेचा झेंडा

शिवसेना – १० जागांवर विजयी
राष्ट्रवादी आणि काँग्रेस – ६ जागांवर विजयी
भाजप – १ जागेवर विजयी


हेही वाचा : Nagar Panchayat Election Results 2022 : कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांची एकहाती सत्ता, १० जागांवर मुसंडी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -