घरदेश-विदेशगोव्यासाठी शिवसेनेचे उमेदवार जाहीर

गोव्यासाठी शिवसेनेचे उमेदवार जाहीर

Subscribe

10 ते 12 उमेदवार मैदानात उतरवणार

गोवा विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेने आपल्या 9 उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर केली. शिवसेना गोव्यात 10 ते 12 जागी उमेदवार उतरवणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. तसेच पणजीमधून शैलेंद्र वेलिंगकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन गोवा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी ते म्हणाले की, गोव्यात शिवसेना 10 ते 12 जागा लढवणार आहे. आज 9 उमेदवारांची घोषणा आम्ही करत आहोत. पेडणे, म्हापसा, शिवली, हळदोणे, पणजी, परये, वाळपयी, वास्को आणि केपे अशा 9 जागांवर शिवसेना निवडणूक लढणार आहे. ही पहिली यादी असून उद्यापर्यंत आम्ही उरलेल्या 3 मतदारसंघाची घोषणा करणार आहोत. शिवसेना ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने आणि ताकदीने लढणार आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

वातावरण गढूळ
गोव्याच्या राजकारणात शिवसेना नवीन पक्ष नाही. जरी मागील निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश मिळालेले नसले, तरी शिवसेना येथे दमदारपणे काम करत आहे. शिवसेनेने 2017 साली गोव्यातील निवडणूक लढवली होती. परंतु यावेळी गोव्यातील राजकीय वातावरण जनतेसाठी फार आशादायी दिसत नाही. वातावरण पूर्ण गढूळ झाले आहे.

अनेक राजकीय पक्ष इथे नव्याने उतरले आहेत. उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. नक्की कोण कोणत्या पक्षातून निवडणुका लढतेय, हे सुद्धा स्पष्ट होत नाही. हिंदी भाषेमध्ये आयाराम-गयाराम हा शब्द प्रचलित आहे. त्याप्रमाणे गोव्यामध्ये आले माऊ- गेले माऊ हा शब्द राजकीय प्रचारात प्रचलित आहे. कारण कधी कोण गेले आणि कधी कोण जाईल याचा काहीही भरोसा नाही. त्याही परिस्थितीत शिवसेना ही निवडणूक लढत आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

आदित्य ठाकरे प्रचाराला
महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रमुख नेते प्रचाराला येतील. युवासेनेचे प्रमुख नेते प्रचाराला येतील. मतदान संघात ते काम करतील. काही मतदारसंघात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे स्वतः प्रचाराला उतरतील, अशी माहिती देखील संजय राऊतांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -