घरमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंच्या सिल्लोडमधील सभेला परवानगी; 'या' ठिकाणी होणार सभा

आदित्य ठाकरेंच्या सिल्लोडमधील सभेला परवानगी; ‘या’ ठिकाणी होणार सभा

Subscribe

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सिल्लोडमधील सभेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यांच्या सभेस परवानगी मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर त्यांच्या सिल्लोडच्या सभेला परवानगी मिळाली आहे. पण ही सभा नियोजित ठिकाणी होणार नसून ठिकाणं बदलण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे यांची सभा आता 7 नोव्हेंबर रोजी सिल्लोडच्या आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या जागेत होणार आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची एकाच दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबर रोजी सिल्लोडमध्ये जाहीर सभा होणार आहे. सिल्लोड हा शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंची सभा ही राजकीय चर्चेचा विषय ठरतेय. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत सुरुवातीला आदित्य ठाकरे यांची महावीर चौकात होणाऱ्या सभेला परवानगी नाकारली. पण याचवेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जिल्हा परिषदेच्या मैदानावरील सभेस परवानगी दिली आहे.

- Advertisement -

काही तासांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवागनी नाकारली होती, मात्र आता पोलिसांनी परवानगी दिली आहे, सिल्लोडमधील आदित्य ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली मात्र ठिकाण बदललं आहे. ठाकरे गटाकडून शहरातील महावीर चौकात परवानगी मागितली होती, मात्र पोलिसांनी आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या जागेत आदित्य ठाकरेंना सभा घेण्यास परवानगी दिली आहे. पोलिसांच्या या भूमिकेवर शिवसेना ठाकरे गट काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष आहे.

राज्याचे मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागत आहे. अलीकडे सत्तार यांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते औरंगाबादमधील जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडीओवरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सत्तारांवर टीका केली होती. यावरून अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. यानंतर अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख छोटा पप्पू असा केला होता.


राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -