शिवसेनेच्या भगव्याला हात लावू देऊ नका; बंडखोरांशी दोन हात करण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश

शिवसेनेचा भगव्याला हात लावू देऊ नका. बंडखोरांशी दोन हात करण्याचे उद्धव ठाकरे यांचे आदेश

uddhav thackeray
उद्धव ठाकरे

मुंबई – शिवसेनेचा भगवा कोणालाही हिसकवू देऊ नका. त्यातूनच जर भगव्याला हात लावण्याचा कोणी प्रयत्न केलाच तर त्याला दाखवून द्या, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी बंडखोरांशी दोन हात करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना नवा आदेश दिला.

मी कोणालाही कमी लेखत नाही. आपल्याला जिंकायचे आहे. मर्दासारखे जिंकायचे आहे. प्रतिज्ञापत्रे एवढी झाली पाहिजेत की भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची कोणाची हिंमत व्हायला नको. सगळ्यांना वेळेवर जबाबदारी नक्की देईन. पण तोवर शिवसेनेचा भगवा कोणाला हिसकू देऊ नका. भगव्याला हात लावण्याचा कोणी प्रयत्न केला त्याला दाखवून द्या, असा आदेश उद्धव ठाकरेंनी दिला.

मुंबईत आपली ताकत वाढली आहे. या ताकदीने नाशिकमध्ये एक लाखापेक्षा अधिक सदस्य नोंद झाली पाहिजे. माझा भरवसा तुमच्यावर आहेत. माझ्याकडे तुमच्याशिवाय दुसरे कुणीही नाही. समोरच्यांनी सदस्य नोंदणीसाठी एजन्सीवाले नेमले आहेत. मात्र, ते जेवढी सदस्य संख्या करत आहेत त्याच्या दसपटीने मला हवी आहे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांकडे केली.

केवळ गर्दी आणि,फोटो नकोत. फोटो घेऊन निवडणूक आयोगाकडे गेलो तर तुमचे सदस्य दाखवा असे ते म्हणतील. त्यामुळे ते आपल्याला घरी परत पाठवून देतील. त्यांच्या एजन्सी काम करत असल्याने आपल्याला सदस्यांची संख्या ही दसपटीने जास्त असायला हवी आहे असेही ठाकरे म्हणाले.