घरताज्या घडामोडीत्यांना शिवसेना हवीये मात्र ठाकरे नकोत, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

त्यांना शिवसेना हवीये मात्र ठाकरे नकोत, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

Subscribe

बंडाळीनंतर राज्यात शिंदे गट विरुद्ध शिवसेना यांच्यातील वादाला सुरूवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांकडून वारंवार शिंदे गट आणि एकनाथ शिदे यांच्यावर टीका केली जात आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर निशाणा साधला आहे.

बंडाळीनंतर राज्यात शिंदे गट विरुद्ध शिवसेना यांच्यातील वादाला सुरूवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांकडून वारंवार शिंदे गट आणि एकनाथ शिदे यांच्यावर टीका केली जात आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर निशाणा साधला आहे. “तो शिवसैनिक नाही तर दगाबाज मुख्यमंत्री आहे. त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हवा आहे. मात्र, त्यांचा मुलगा नकोय. मी बाळासाहेबांचा वारसा पुढे घेवून चाललोय म्हणून मी त्यांना नकोय”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीका केली.

“त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हवा आहे. पण, त्यांचा मुलगा नकोय. मी बाळासाहेबांचा वारसा पुढे घेवून चाललोय म्हणून मी त्यांना नकोय. तुम्ही याला घराणेशाही म्हणता तर म्हणा. लोकसभा निवडणूकीत युती होती. आमच्या खांद्यावर पाय ठेवून तुम्ही दिल्ली गाठली. मात्र २०१४ च्या विधानसभेत असे काय झाले होते, त्यावेळी तुम्ही एकला चलो रे चा नारा दिला. कारण त्यावेळी तुम्हाला शिवसेना संपवायची होती. आता तुम्ही म्हणणार की आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री केला. पण तो शिवसैनिक नाही तर दगाबाज मुख्यमंत्री आहे”, अशी टीका ठाकरेंनी केली.

- Advertisement -

“मंत्रीपदासाठी शिवसेना कुणाच्या ढेंग्याखालून जात नाही. शिवसेना ही भाजपापेक्षा कित्येकपटीने प्रखर हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे शिवसेना पाहिजे पण ठाकरे नकोत. कारण ठाकरे बोलतात आणि झोडून काढतात. पण ठाकरेंशिवाय शिवसेना ही कदापि होवू शकणार नाही. हा लढा पैसा विरुद्ध निष्ठा असा आहे. त्यामुळे त्यांना आपल्याला दाखवून द्यायचे आहे की निष्ठा ही पैशाने विकत घेता येत नाही. हे सर्व चोरायला निघाले आहेत. सिंबॉल चोरत आहेत. ही मर्दांची टोळी नाही तर चोरांची टोळी आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

“निष्ठेने राहिला असतात तर याच्या-त्याच्याकडे जायची गरज नसती. लोक तुम्हाला भेटायला आले असते. मी प्रत्येक दिवशी त्यांना आव्हान देतोय की जर मर्दांची अवलाद असाल तर स्वतःच्या आईवडिलांचे फोटो लावून निवडणूक लढा. हिम्मत असेल तर नवा पक्ष काढा शिवसेना कशाला चोरता”, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

- Advertisement -

हेही वाचा – निवडणुका झाल्या तर आम्ही तयार, नाशिक दौऱ्यात शरद पवारांची भूमिका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -