घरमहाराष्ट्रशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची गोरेगावात सभा, कोणावर साधणार निशाणा?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची गोरेगावात सभा, कोणावर साधणार निशाणा?

Subscribe

मुंबई – काही महिन्यांवर आलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या आणि शिवसेनेत झालेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवसेना गटप्रमुखांचा आज मेळावा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दसरा मेळाव्याआधी होणाऱ्या मेळाव्याला विशेष महत्त्व आले असून मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात आज संध्याकाळी 7 वाजता हा मेळावा होणार आहे.

मुंबई महापालिकेत 30 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. त्यापैकी 25 वर्ष शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. मागच्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये लढत झाली. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये कमी अंतर राहिले होते. त्यामुळे शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत.

- Advertisement -

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शिवसैनिकांना जाहीर मार्गदर्शन करणार आहेत. शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये मुंबईसह इतर ठिकाणी राडे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 उद्धव ठाकरे या मुद्द्यांवर घालू शकतात भावनिक साद –

- Advertisement -

शिवसेनेचे राजकारण बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व आणि मराठी माणूस यांच्या भोवती फिरत आलेले आहे. बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना भाजपने फोडल्याचा वारंवार आरोप होत आहे. अगोदर  पक्ष फोडला, मग चिन्हासाठी धडपड आणि आता दसरा मेळाव्यासाठी असलेल्या शिवतीर्थासाठी भांडण या मुद्दयांवरून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना भावनिक साद घालू शकतात.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -