उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, जिल्हाप्रमुखांच्या बोलावल्या बैठका

एकनाथ शिंदेंच्या एकूणचं बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे शिवसेनेने आता पुन्हा संघटना बांधणीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

shiv sena crisis after the revolt of eknath shinde now the meeting of the district chief with uddhav thackeray on matoshri

महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगात आता नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे पक्षासमोरील वाढते संकट पाहता शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची आज तात्काळ महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुपारी १२ वाजता शिवसेना भवनात ही बैठक पार पडणार आहे.

यामुळे शिवसेनेच्या राज्यातील जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुखांची आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत काय रणनिती ठरते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. या बैठकीत काही मोजके अपवाद वगळता संपूर्ण संघटना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे आहे. त्यामुळे बहुतेक जिल्हाप्रमुख आजच्या बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे. तर ठाण्यातील तीन जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीबाबत मात्र सस्पेन्स कायम आहे. अद्याप निरोप आला नसल्याचे ठाण्यातील जिल्हाप्रमुखांकडून सांगण्यात येत आहे. एकूणचं या राजकीय घडामोडींमुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर दुहेरी आव्हान निर्माण झाले आहे. एकीकडे संघटना वाचवण्याचं आणि कायदेशीर लढाईचं आव्हान तर दुसरीकडे विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेर संघर्ष अशी दोन आव्हान आता मुख्यमंत्र्यांना पार करावी लागणार आहेत. दरम्यान शिवसेनेचे बंडखोर नेते संजय शिरसाट यांनी पत्रात मुख्यमंत्री आणि त्याच्याभोवताचे बडवे

गेले त्यांचा विचार करु नका, ताकदीनं लढा; मुख्यमंत्र्यांचा विभागप्रमुखांना कानमंत्र

दरम्यान गुरुवारी देखील शिवसेनेच्या विभाग प्रमुखांची एक बैठक पार पडली. या बैठकीत जे गेले त्यांचा विचार करु नका, ताकदीनं लढा, असा कानमंत्र मुंबईतील विभागप्रमुखांना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच आपल्या विभागावर मेळावे लावा, शाखा शाखा पिंजून काढा, आपण हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यांवर आजही काम आहोत. आपल्याला आणखीन ताकदीनं लढायचं आहे. त्यासाठी आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना जोर लावून पक्षबांधणीसाठी योगदान द्यावं लागेल. असे आदेशही उद्धव ठाकरेंनी विभागप्रमुखांना दिले आहेत. विभागप्रमुखांना त्यांना त्यांच्या विभागातील राजकीय परिस्थितीची अचूक माहित असते. त्यामुळे विभाग प्रमुखांकडून आता शिवसेनेची प्रत्येक वॉर्डची माहिती घेतली जाणार आहे.

मातोश्रीवर बैठकांवर सिलसिला सुरु 

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आपला मुक्काम वर्षावरुन पुन्हा मातोश्रीवर हलवल्यानंतर शिवसैनिक मातोश्रीवर येत आहेत. दरम्यान काल रात्रीही मातोश्रीबाहेर शेकडो शिवसैनिकांनी गर्दी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी त्यांची भेट घेत भर पावसात त्यांच्यासोबत चर्चा केली. यामुळे बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्री कोणालाही भेटत नसल्याच्या आरोपांना आता शिवसेनेकडून फोडून काढण्याचे प्रयत्न सुरु आहे.

बंडखोर आमदारांविरोधात शरद पवार मैदानात 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही आता महाविकास आघाडी सरकार वाचण्यासाठी मैदानात उतरले आहेत. बंडखोर आमदारांची निधी न मिळण्याबाबतचा आरोप हे वस्तूस्थितीला धरुन नाही. त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो कायद्याविरोधात आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. असा इशारा आता शरद पवारांनी दिला आहे. शरद पवारांची या एन्ट्रीमुळे आता शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाची भाजपसोबत सत्ता स्थापनेची कायदेशीर प्रक्रिया लांबणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवसैनिक आणि राज्यातील जनतेसोबत ऑनलाईन संवाद साधला. ज्या शिवसेना आमदारांना मी नालायक आमदार वाटतो त्यांनी समोर येवून सांगाव मी दुसऱ्या क्षणाला राजीनामा देतो, तुम्हाला विश्वास नसेल तर मी वर्षा सोडून मातोश्रीवर माझा मुक्काम हलवणार आहे. बंडखोर शिवसेना आमदारांनी पक्षात परत या अशी भावनिक साद घातली. मात्र त्यानंतरही बंडखोर आमदारांनी मुंबईत येण्यास तयारी दर्शवली नाही. उलट शिंदे गटात सामील होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय.

मुख्यमंत्र्यांची भावनिक संवाद साधताना त्यांनी मातोश्रीवर पुन्हा जाण्याचे संकेत दिले आणि त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान असलेले वर्षा बंगला सोडला. यावेळी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या भावनिक संवादाला प्रतिसाद देत वर्षा बंगला तसेच शिवसेना भवन येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ याठिकाणी घोषणाबाजी केली. तसेच उद्ध्वस्त ठाकरे जी भूमिका घेतील त्यासाठी आम्ही तयार आहोत असाही पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता. यावेळी उपस्थित सर्व ठाकरे कुटुंबियांना डोळ्यातील अश्रू अनावर झाले आहेत, मुख्यमंत्र्यांसोबत पत्नी रश्मी ठाकरे, दोन्ही मुले आदित्य आणि तेजस ठाकरे हे देखील वर्षा या सरकारी बंगल्यातून मातोश्री या खाजगी निवासस्थानी रवाना झाले होते.

उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ पाठिंबा दाखवणारे फलक घेऊन हजारो शिवसैनिक वर्षापासून ते मातोश्रीपर्यंत उभे होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी देखील मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांच्या घोषणेला गाडीतून बाहेर येत प्रतिसाद दिला. वर्षा बंगल्यातून मातोश्रीवर उद्धव ठाकरे जाणार म्हणून शिवसैनिक भावूक झालेलेही याठिकाणी दिसले. उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यातील सामान, वस्तुने भरलेल्या वाहनांचा ताफाही मातोश्रीकडे निघालेला याठिकाणी पहायला मिळाला. एकूणच महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिकांसाठी हा भावनिक क्षण होता.

एकनाथ शिंदेंच्या एकूणचं बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे शिवसेनेने आता पुन्हा संघटना बांधणीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे. तसेच गाठीभेटींचे सत्र चालू केले आहे.


मविआ सरकार पायउतार होण्याच्या मार्गावर, उद्धव ठाकरेंनी गमावले नियंत्रण, आता पुढे काय?