घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर...म्हणून ध्वजारोहणाची वेळ बदलली, शिवसेनेची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

…म्हणून ध्वजारोहणाची वेळ बदलली, शिवसेनेची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Subscribe

औरंगाबाद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज औरंगाबादमध्ये आज हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. 9 वाजता होणारे ध्वजारोहण 7 वाजताच उरकण्यात आले आहे. त्यामुळे निषेध म्हणून शिवसेनेकडू पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केलेल्या ठिकाणी अभिवादन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह चंद्रकांत खैरे उपस्थित होते.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहणाच्या वेळेवरून शिवसेना-शिंदे गटातील राजकीय वाद पाहायला सुरू झाल आहे. दरवर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानात सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. मात्र, यावर्षी सकाळी सात वाजताच ध्वजारोहण करण्यात आले. त्यामुळे यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.

- Advertisement -

शिवसेनेचा आरोप काय –

यावर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की, दिल्लीतून पातशहा हैदराबादच्या कार्यक्रमाला येणार आहे. त्याच कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा उपस्थित राहायचे होते. यासाठी औरंगाबादच्या ध्वजारोहणाची वेळ बदलण्यात आली. मुख्यमंत्र्यांची ही भूमिका म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे. याचाच निषेध करण्यासाठी आम्ही 9 वाजता पुन्हा एकदा अभिवादन केल्याचे दानवे म्हणाले. मुख्यमंत्र्यांसाठी ज्या घोषणा केल्या त्या जुन्या आहेत, त्यातील अनेक कामे सुरू आहेत. नवीन कोणतीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केले नाही. हा मराठवाड्यावर अन्याय आहे. पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाडा मागे आहे. त्याला पुढे आणण्यासाठी हा क्षण होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा केली नाही. 9 वाजता आम्ही पुन्हा एकदा अभिवादन करणार आहोत, असं दानवेंनी सांगितले. दानवे म्हणाले की, भूखंडाच्या सर्व फाईल थांबवल्या आहेत, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. उद्योगासाठी हे घातक असून यापूर्वी असे कधीही झालेले नाही. उद्योजक नाराज असून दिल्लीपर्यंत याच्या तक्रारी गेल्या आहेत, असे दानवे म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -