प्रताप सरनाईकांचे वाढदिवसानिमित्त जनतेला अनोखं रिटर्न गिफ्ट; 1 रुपये प्रतिलिटरने पेट्रोलचे वाटप

कोणत्याही राजकीय नेत्यांकडून निवडणुकीपूर्वी आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेला भेटवस्तुंचे वाटप केलं जातं. अशाच प्रकारे आज शिवसेना आमदार प्रतापसरनाईक यांनी वाढदिवसामिमित्त जनतेला भेटवस्तू दिली आहे. पण त्यांच्या या भेटवस्तूची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

कोणत्याही राजकीय नेत्यांकडून निवडणुकीपूर्वी आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेला भेटवस्तुंचे वाटप केलं जातं. अशाच प्रकारे आज शिवसेना आमदार प्रतापसरनाईक यांनी वाढदिवसामिमित्त जनतेला भेटवस्तू दिली आहे. पण त्यांच्या या भेटवस्तूची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. प्रतापसरनाईक हे ठाण्याचे आमदार असून, त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त सरनाईकांनी चक्क पेट्रोलचे वाटप ठेवलं आहे. विशेष म्हणजे फक्त 1 रुपयांत नागरिकांना 1 लीटर पेट्रोलचे वाटप केलं जात आहे. त्यामुळे त्यांच्या या पेट्रोल वाटपाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

प्रताप सरनाईकांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी ठाण्यातील घोडबंदर रोड येथील तत्वज्ञान विद्यापीठाजवळील कैलास पेट्रोल पंपावर 1 रुपये प्रति लिटर पेट्रोलचे वाटप करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आशा डोंगरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संदीप डोंगरे आणि अब्दुल सलाम यांनी या उपक्रमाचा शुभारंभ केला. देशातील वाढत्या पेट्रोलच्या किमतींविरोधात शिवसेनेच्या वतीने प्रतिकात्मक निषेध नोंदवत सुमारे 1000 वाहनधारकांना प्रति लिटर 1 रुपये प्रति लिटर पेट्रोलचे वाटप करण्यात आले.

पेट्रोल प्रति लीटर 1 रुपयाला घेण्यासाठी सोमवारी सकाळी १० वाजता कैलास पेट्रोल पंपावर जनतेची मोठी गर्दी जमली होती. शिवसेनेच्या माजी नगरसेविका आशा डोंगरे यांच्यासह संदीप डोंगरे, अब्दुल सलाम यांच्या हस्ते पेट्रोलचे वाटप करण्यात आले.

“पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. या वाढत्या दरवाढीतून सर्वसामान्यांना दिलासा मिळत नाही. केंद्राकडूनही दिलासा दिला जात नाही. त्यामुळे या दरवाढीबाबत आम्ही जास्त काही करू शकत नाही. पण एक दिवस का होईना, सर्वसामन्यांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो. त्यामुळे माझी पत्नी आशा डोंगरे हिने 1 रुपये प्रतिलीटर पेट्रोल वाटपाची अनोखी संकल्पना सुचवली. तसंच, जोपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर 100च्या खाली येत नाही तो पर्यंत आम्ही नेहमी असा प्रयत्न करू”, असे संदीप डोंगरे यांनी म्हटले.

“आज सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नाकडे कोणीही बघायला तयार नाही, पण बहुतांश राजकारणी सर्वसामान्यांसाठी अजिबात महत्त्वाचे नसलेल्या प्रश्नांमध्ये गुतलेले आहेत. सर्वसामन्य जनतेला सध्या स्वत:चे वाहन चालवण्यासाठी खिशाला कात्री लावावी लागते. त्यामुळे एक दिवस पेट्रोल 1 रुपये प्रति लिटरने उपलब्ध करून दिले तर त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळत आहे”, असंही डोंगरे यांनी म्हटलं.


हेही वाचा – माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोलेंचे निधन