घरताज्या घडामोडीShiv Sena Dussehra Rally: 'आम्हाला भाडोत्री बाप नको' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तोफ...

Shiv Sena Dussehra Rally: ‘आम्हाला भाडोत्री बाप नको’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Subscribe

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर न घेता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात संपन्न झाला. ५० मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. कोरोनामुळे यंदा जाहीर दसरा मेळावा घेण्याची परंपरा खंडित झाली. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संध्याकाळी ६.३० वाजता कुटुंबियासहीत शिवाजी पार्कवर दाखल झाले. तिथे स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर ठीक ७ वाजता समोरच असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात त्यांनी आपले भाषण पुर्ण केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर चहुबांजूनी टीका केली. गेल्या काही काळापासून राज्यात विरोधकांनी टीकेची वावटळ उठवली होती. तसेच केंद्राकडून GST चा परतावा मिळत नाही. या सर्व विषयांवर ठाकरेंनी सणसणीत भाष्य केले. तसेच सरकार पाडापाडी करण्यापेक्षा देशाच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्या, अन्यथा अराजकता माजेल, असे सूचक इशाराही ठाकरेंनी भाजपला दिला.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेले संपुर्ण भाषण मुद्देस्वरुपात खालील प्रमाणे –

आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपेवर चिकटलेले मुंगळे नाहीत. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच.

जो आडवा येईल, त्यावर गुढीपाडवा करणारा हा महाराष्ट्र आहे. आजही आमच्या हृदयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने आहे. पुर्वी बाळासाहेब असताना

- Advertisement -

बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत. आपल्याकडे दरवर्षी इंजेक्शन द्यावी लागतात.

सध्या एक बेडूक आणि त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात जातात. बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला अशी कविता होती. पण या बेडकाच्या पिलाने वाघ पाहिला. या लोकांचा थोडाफार समाचार घेणे गरजेचे आहे.

मी मुख्यमंत्री होऊन एक वर्ष होत आले, मागचे सहा महिने मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होतो. मात्र आज मी शिवसेनाप्रमुख म्हणून मी बोलणार आहे. आज मी संयम ठेवून बोलेल. पण संयमातील सं गेला की यम राहतो. त्यामुळे आज जरा शब्द ढळले तर माफ करा.

खोटेनाटे आरोप आमच्यावर होत आहेत, तरिही मी शांत का? असे प्रश्न विचारले जात आहे. मात्र केवळ माझ्या शब्दाखातर शिवसेनेचे नेते शांत राहिले आहेत. ते जर शांत राहिले नसते तर काय झाले असते त्याचा विचार करा.

आज जे हिंदुत्त्वावर आम्हाला प्रश्न विचारत आहेत ते लोक बाबरी पाडली तेव्हा बिळात तोंड लपवून बसले होते. तेव्हा यांचे नाव घरातल्या खेरीज कुणालाही माहीत नव्हते. बाळासाहेब म्हणायचे माझे हिंदुत्त्व मंदिरातील घंटा बडवणारे हिंदुत्व नाही. तर दहशतवादी बडवून काढणारे हिंदुत्व आहे. आम्ही कोरोना आल्यानंतर थाळ्या वाजवून कोरोनाला पळवणारे तुमचे हिंदुत्व पाहिले.

गोवंश हत्या बंदीचा कायदा केला, तेव्हा आम्ही महाराष्ट्रात तो लागू केला. मग गोव्यात का नाही गोवंश हत्या बंदी. महाराष्ट्रात गाय माता आणि बाजूला जाऊन खाता, हे कसं काय चालते.

आज सकाळी संघाचा कार्यक्रम झाला. त्यात मोहन भागवत यांनी जे काही सांगितले ते हिंदुत्त्व तरी काळी टोपी घालणारे लोक ऐकणार की नाही. काळ्या टोपीखाली डोकं नावाचा प्रकार आहे की नाही? असे सांगताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणाच्या ओळ्या उद्धव ठाकरे यांनी वाचून दाखविले. काळ्या टोप्याखालील डोक्यात जर मेंदू असेल तर सरसंघचालक हिंदुत्त्वाबद्दल काय बोलत आहेत, ते ऐका आणि मग पत्र लिहण्याची खर्डेघशी करा.

राजकारण म्हणजे शत्रूमधील युद्ध नव्हे. “विवेक पाळा” हे ते कुणाला उद्देशून बोलत असतील. जे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी विवेक पाळण्याची गरज आहे. मध्य प्रदेशमधले सरकार पाडले, महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. भाजप जेवढे लक्ष पक्ष वाढविण्याठी देत आहे, तेवढे लक्ष जर देशावर दिले तर प्रगती होईल.

जीएसटीची पद्धत फसलेली आहे. पंतप्रधानांनी आपली चूक प्रामाणिकपणे मान्य केली पाहीजे किंवा त्यात सुधारणा केली पाहीजे. मी यानिमित्ताने देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना आवाहन करत आहे की, आपण केंद्रासोबत GST बाबात चर्चा करुया. या पद्धतीमुळे राज्यांचे नुकसान होत आहे.

ब्रिटिशांप्रमाणे काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंतचा हिंदुस्तान आम्ही पांदाक्रांत करणार अशी

हरियाणाच्या कुलदिप बिष्णोई सोबत जो डाव खेळला गेला, तो बिहारच्या नितीश कुमार यांच्या सोबत खेळला जाणार. त्यामुळे मी नितीश कुमार यांना आज शुभेच्छा देतो. २०१४ साली हा डाव शिवसेनेच्या सोबत खेळला गेला होता. मी त्यावेळीही बोललो होतो, आजही बोलतो. छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपल्याला काहीतरी शिकावे लागेल. एकतर आपण पाठीत वार करायचा नाही, जर कुणी वार केला तर त्याचा कोतळा काढल्याशिवाय ठेवायचे नाही.

छत्रपती म्हणाले, होय मी शत्रूला दगा दिला आणि देतो. पण एकतरी उदाहरण दाखवा जिथे मी मित्राला दगा दिला.

मोहन भागवत यांना राष्ट्रपती करा, अशी मागणी आम्ही करत होतो. हिंदुत्त्व हेच राष्ट्रीयत्व असे आम्ही म्हणत होतो. पण संघाला विरोध करणारे नितीश कुमार तुम्हाला चालतात. २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे दावेदार निश्चित झाले, तेव्हा नितीश कुमार सेक्युलर पंतप्रधान व्हावा, असे सांगून एनडीएतून बाहेर पडले होते. आज त्यांनाच भाजप जवळ करत आहे.

केंद्राकडून आम्ही जूनपासून आपत्कालीन निधी मागत आहोत. पण ते आम्हाला मिळालेले नाही.

भाडोत्री बाप आम्हाला स्वीकारण्याची गरज नाही. आहेराची पाकिटे पळवणारे तुमचे बाप आहे.

रावणाच्या दहा तोंडामधील एक तोंड म्हणतंय, मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर झालेला आहे. मोदी म्हणाले होते, आपण पाकव्याप्त काश्मीर भारतात आणून दाखवू.

घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत येऊन कमवायचं आणि इथेच गरळ ओकायची, असली रावणाची दहा तोंडी औलाद आहे.

महाराष्ट्राच्या घराघरात तुळशीची वृदांवने आहेत, इथे काही घरोघरी गांजा लावला जात नाही. मग महाराष्ट्राची आणि पोलिसांची बदनामी कशासाठी? छातीवर गोळ्या झेलून जिवंत अतिरेक्याला पकडणारे एकही पोलीस दल जगात नाही.

मुंबई पाक व्याप्त काश्मीर होऊच शकत नाही. पण असे बोलणं म्हणजे मोदींचा अपमान आहे. कारण देशात पाकव्याप्त काश्मीर होत असेल तर हे पंतप्रधानांचे अपयश होते.

एका अभिनेत्याने आत्महत्या केली की लगेच तो बिहारचा पुत्र झाला. त्याच्या आत्महत्येत काही काळंबेरं असतं तर मुंबई पोलिसांनी शोधलं असतं.

तोडांत शेण भरून गोमुत्राच्या गुळण्या तुम्ही टाकल्या. आता ते शेण खाल्लेलं तोंड घेऊन शांत बसा. महाराष्ट्र द्वेष्ट्यांची औलाद बघितल्यानंतर मी राज्यातील जनतेला आवाहन करतो की तुम्ही सांभाळून रहा.

मित्रपक्षाशी इमान ठेवू नका पण निदान मातीशी तरी इमान ठेवा.

आरेमध्ये ८०० एकरचे जंगल राखण्याचा निर्णय आम्ही घेतला. सरकारने एकही रुपया खर्च न करता कांजूरमार्ग येथे कारशेड बनविण्याचा निर्णय घेतला. फक्त मुंबई नाही तर कल्याण डोंबिवलीपर्यंत मेट्रो नेण्यासाठी कांजुरमार्ग येथे कारशेड बनविले जात आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष न देता केवळ सरकार पाडापाडीकडे केंद्र सरकार लक्ष देत असेल तर आपण अराजकतेकडे जात आहोत.

मंदिर उघडणार आहेच. लॉकडाऊन करण्याची मला हौस नाही. पण ज्यावेळी भारत-चीन तणावादरम्यान आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिशी उभे राहिलो, त्याप्रकारे कोरोनाच्या संकटात तुम्हाला सरकारच्या पाठिशी उभे राहता नाही आले.

कोणीही चालेल पण हे नको, असा विचार आता जनतेमध्ये रुजत आहे.

यांच्या छक्के पंज्ज्याना बळी न पडता पुढच्या काळात मतदान करा.

मराठा, धनगर आणि सर्व समाजांना मी वचन देतो. हे तुमचे सरकार आहे. धनगर, ओबीसी, आदिवासी आणि मराठा समाजाला मी हात जोडून नम्र विनंती करतो की, महाराष्ट्र द्वेष्टे जे जातीमध्ये भिंती उभ्या करत असतील त्यांच्यापासून सावध रहा.

आज दसरा आहे. आज बेलभंडारा उचलून महाराष्ट्राला तडा जाईल, असे कोणतेही कृत्य करणार नाही, ही शपथ घेऊया.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -