घरमहाराष्ट्रशिवसेनेची बहुमत चाचणी विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव, याचिकेवर सायंकाळी 5 वाजता होणार...

शिवसेनेची बहुमत चाचणी विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव, याचिकेवर सायंकाळी 5 वाजता होणार सुनावणी

Subscribe

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला दिलेल्या बहुमत चाचाणीच्या आदेशा विरोधात शिवसेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात 5 वाजत सुनावणी होणार आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या निर्देशाविरोधात याचिका दाखल केली. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने याप्रकरणी सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.

न्यायालयात काय झाला युक्तीवाद  –

- Advertisement -

अभिषेक मनु सिंघवी यांनी अशा प्रकारे तातडीने बहुमत चाचणी बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. यानंतर दोन्ही न्यायाधीशांनी आपापसात चर्चा केली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला कागदपत्रे द्यावीत. त्यावर आम्ही आज चार वाजेपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करू, असे सिंधवी यांनी सागीतले आमच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. त्यानंतर त्यानंतर सुनावणी झाली तर आमचे म्हणणे निरर्थक ठरेल, असे सिंघवी यांनी म्हटले. यावर शिंदे गटाकडून दावा करण्यात आली की बहुमताच्या चाचणीसाठी आधिवेशन बोलावण्याचा राज्यपालांचा अधिकार आहे. त्यात कुणी ढवळाढवळ करू शकत नाही, असे निरज किशन कौल यांनी म्हटले.

पाच वाजता सुनावणी –

- Advertisement -

यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आजच या प्रकरणी सुनावणी होईल. दुपारी तीन वाजेपर्यंत कागदपत्रे तयार ठेवा, असे म्हटले. संध्याकाळी पाच वाजता यावर सुनावणी होईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -