शिवसेना पक्षाच्या निधीचे ठाकरे गटाने काय केले?; वाचा सविस्तर

केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल आपल्या विरोधात जाणार असल्याचा अंदाज ठाकरे गटाला आला असावा. त्यामुळेच शिवसेना पक्षाचा कोट्यवधी रुपयांचा निधी ठाकरे गटाने स्वंतत्र खाते उघडण्यात आले, असे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष गेल्यास ते पक्षाच्या निधीवरही दावा सांगू शकतील. त्यामुळे हा निधी अगोदरच वळवल्याचे बोलले जात आहे.

uddhav thackery
उध्दव ठाकरे

मुंबईः शिवसेना पक्षाचा कोट्यवधी रुपयांचा निधी ठाकरे गटाने आपल्या खात्यावर वळवल्याची माहिती समोर आली आहे. हा निधी वळवण्यासाठी नवीन खाते उघडण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र हा निधी किती आहे याची माहिती मिळू शकली नाही.

केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल आपल्या विरोधात जाणार असल्याचा अंदाज ठाकरे गटाला आला असावा. त्यामुळेच शिवसेना पक्षाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वळवण्यासाठी ठाकरे गटाने स्वंतत्र खाते उघडले, असे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष गेल्यास ते पक्षाच्या निधीवरही दावा सांगू शकतील. त्यामुळे हा निधी अगोदरच वळवल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट व निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. ते म्हणाले, त्यांना फोटो चोरावा लागतो. चिन्ह चोरावं लागतं. त्या नार्मदांना चोरी पचणार नाही. गद्दारांना मोठं करणारी जनता माझ्या सोबत आहे. त्यांना आम्ही जड गेलो. त्यामुळेच त्यांनी पैशाच्या जोरावर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल विकत घेतला. जनतेला हे पटणारे नाही. जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.

शिवसेनाप्रमुखांनी पुजलेला धनुष्यबाण आजही माझ्याकडेच. १०० कौरव एकत्र आले तरी पांडव जिंकले. महाराष्ट्रातील जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयात आम्ही जिंकू अशी अपेक्षा. केंद्रीय मंत्री म्हणाले होते द्या ब्रेकींग न्यूज. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चिन्ह व नाव शिंदे गटाला मिळेल. हे त्यांना आधीच कसे कळाले.  आज धनुष्यबाण ओरबाडून घेतले तरी तुम्हाला मिळणार नाही. चोरी पचली तरी चोर चोरच असतो. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार. तोवर त्यांना पेढे खाऊ द्या. शिवसैनिकांनो खचून जाऊ नका. हिंमत सोडू नका, असे चोर चोरी पचवू शकणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. आणीबाणी लावली म्हणून इंदिरा गांधींना पण जनतेने नाकारले होते. यांनी कागदावर धनुष्यबाण चोरलाय. आता भाजपला बाळासाहेबांचा चेहरा लावून निवडणुका जिंकायच्या आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.