घरमहाराष्ट्रठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का; खासदार गजानन कीर्तिकरांचा शिंदे गटात प्रवेश

ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का; खासदार गजानन कीर्तिकरांचा शिंदे गटात प्रवेश

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली, ज्यामुळे शिवसेनेत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष सुरु आहे. यात ठाकरे गटातील एक- एक मंत्री, खासदार शिंदे गटात सामील होत आहेत. अशात आता पुन्हा एका खासदाराने शिंदे गटात जाहीर प्रवेश करत ठाकरे गटाला धक्का दिला आहे. शिवसेनेचे खासदार आणि पक्षातील ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे गटाला रामराम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.

मुंबईतील माहीम विधानसभा नागरिक सत्कार सोहळ्यानिमित्त रविंद्र नाट्य मंदिरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात सहभागी झाले आहेत. गजानन कीर्तिकर यांना ठाकरे गटातील एकनिष्ठ खासदार मानले यायचे. पण आता त्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केल्याने शिंदे गटाच्या खासदरांची संख्या 13 वर पोहोचली आहे. पुढील काही दिवसांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आणखी एका खासदाराने पक्ष सोडल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

शिवसेनेचे लोकसभेचे 12 खासदार आधी शिंदे गटात सामील झाले आहेत. यात राहुल शेवाळे, भावना गवळी, कृपाल तुमने, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, प्रतापराव जाधव, धर्यशिल माने, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलिक, श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. यात गजानन किर्तीकर यांची भर पडली आहे.

गजानन किर्तीकर हे शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे किर्तीकर शिंदेंसोबत गेल्याने महत्वाची संघटना असलेली स्थानिय लोकाधिकार समितीदेखील शिंदे गटाबरोबर जाण्याची शक्यता आहे. याचा मोठा फायदा शिंदे गटाला होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : तुरुंगात माझा खूप छळ झाला, संसदीय समितीसमोर मुद्दा उपस्थित करणार; संजय राऊतांची माहिती

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -