घरताज्या घडामोडीतीन नामांतरावर शिवसेना ठाम, कॅबिनेटची बैठक वादळी ठरण्याची शक्यता

तीन नामांतरावर शिवसेना ठाम, कॅबिनेटची बैठक वादळी ठरण्याची शक्यता

Subscribe

राज्यातील राजकीय घडामोडी पाहिल्या असत्या आज सकाळपासूनच बैठकांचं सत्र सुरू आहे. सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बैठक झाली. त्यादरम्यान शिवसेनेचे नेते उपस्थित नव्हते. त्यानंतर मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. त्यामुळे आजच्या बैठकीत महाविकास आघाडी एकत्र चर्चा करताना दिसली नाही. मात्र, आता थोड्याच वेळात कॅबिनेटच्या बैठकीला सुरूवात होणार आहे.या बैठकीत पीकपाणी आणि इतर विषयांसह तीन नामांतराचा मुद्दा मांडला जाऊ शकतो. त्यामुळे आजची कॅबिनेटची बैठक वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सर्वात पहिलं म्हणजे औरंगाबाद शहराचं नामांतरण संभाजीनगर करा, अशी मागणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कालच्या कॅबिनेटच्या बैठकीत घेतली. त्यानंतर नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटलांचं नाव द्या आणि उस्मानाबादचं नामांतरण धाराशीव करा, या तिन्ही नामांतरावर शिवसेना ठाम असून आजच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव अनिल परब यांनी काल मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत मांडला होता. त्याच प्रस्तावावर आज सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक झाली. काँग्रेसकडून शिवसेनेनं घेतलेल्या नामकरणाच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव आल्यास काँग्रेसकडून प्रस्तावाला विरोध करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.


हेही वाचा : गंभीर परिस्थितीत भावा-भावाने एकत्र यावं, उद्धव आणि राज यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या

- Advertisement -

नेत्याचे साकडे

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -