घरमहाराष्ट्र"शिवसेना ही भांडवलदारांची दलाल नाही..", सत्ताधाऱ्यांवर राऊतांची खोचक टीका

“शिवसेना ही भांडवलदारांची दलाल नाही..”, सत्ताधाऱ्यांवर राऊतांची खोचक टीका

Subscribe

शिवसेना ही भांडवलदारांची दलाल नाही, अशा खोचक शब्दांत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत विविध विषयांवरर भाष्य केले आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) हे आज बारसू गावाचा दौरा करणार आहेत. बारसू प्रकल्पाला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांची ते भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे हे साखरी गावात दाखल झाले आहे. पण त्याआधी ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत (Sanjay raut) यांनी बारसू प्रकल्पाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर आणि गावकऱ्यांच्या, भूमिपुत्रांच्या विरोधात जाऊन या प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. शिवसेना ही भांडवलदारांची दलाल नाही, अशा खोचक शब्दांत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत विविध विषयांवर भाष्य केले आहे.

हेही वाचा – काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंची बेळगावातील सभा उधळवली; कर्नाटकातलं राजकारण तापलं

- Advertisement -

यावेळी बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना लोकांचे बोलणे समजून घ्यायचे आहे. ज्या पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार होतोय. अॅट्रॉसिटी सुरु आहेत. ती लोक आपली जमिन सोडायला तयार नाहीत, हे सत्य आहे. अशा वेळी या सगळ्यांचे म्हणणे समजून घ्यावं, ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, आणि त्यानंतर ते महाडला जातील. जेव्हा जेव्हा कोकणावर, कोकणी जनतेवर आघात झाला, तेव्हा शिवसेना तेथील लोकांसाठी धावून गेली आहे. त्यामुळे शिवसेना ही भांडवलदारांची दलाल नाही. शिवसेना तिथल्या कष्टकरी आणि शेतकरी यांच्यासोबत आहे, अशा शब्दात राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.

तसेच जे भांजवलदारांचे दलाल आहेत, ज्यांची तिकडे गुंतवणूक आहे. परप्रांतीयांच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या गुंतवणूकीची भिती वाटते. म्हणून उद्धव ठाकरेंना तिथे येऊ देणार नाही, अशा धमक्या देण्यात येत आहेत. त्यामुळे असे म्हणणाऱ्यांना गृहमंत्र्यांनी अटक करण्याचे आदेश द्यावेत. शिवसेनाला थांबवणारा अजून जन्माला नाही आलेला, असेही यावेळी संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

याला येऊ देणार नाही, त्याला येऊ देणार नाही.. अख्खी शिवसेना तिथे जागेवर आहे. उद्धव ठाकरे आता तिथे पोहोचतील मग काय कराल तुम्ही? त्यामुळे या पोकळ धमक्या देणे बंद करा, अशा शब्दांत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. या राज्यात, देशात आणि रत्नागिरीत लोकशाही आहे. आंदोलक चोर गुन्हेगार नाही. जमीन माझी आई आहे आणि जमीन वाचावायचा आम्हाला हक्क आहे, त्यामुळे 144 कलम लावून काय होणार आहे? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -