घरमहाराष्ट्रशिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी, पत्रातून दिले महत्वाचे आदेश

शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी, पत्रातून दिले महत्वाचे आदेश

Subscribe

राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी राज्यात मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. कारण आता मतदानाला दोनच दिवस शिल्लक राहीले आहेत. अशातच शिवसेनेच्या आमदारांना पक्षाकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला आहे. पक्षाने दिलेल्या आदेशानुसार मतदान करण्याचे आमदारांना सांगण्यात आले आहे. (Shiv Sena issues whip to MLA important orders given in letter)

येत्या १० जून रोजी मतदान असून विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात सकाळी आठ वाजता हजर राहण्याच्या सूचना देण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील सर्व आमदारांची काल मंगळवारी मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीवर चर्चा झाली. त्यानंतर आज शिवसेनेकडून व्हिप जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

पक्षादेशात काय म्हटलंय?

राज्यसभा निवडणुकीचे मतदान शुक्रवार दिनांक १० जून २०२२ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मध्यवर्ती सभागृह, चौथा मजला, विधानभवन, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी मतदानात सहभागी व्हायचे असून सदस्यांनी शुक्रवारी दिनांक १० जून २०२२ रोजी शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालय, दुसरा मजला, कक्ष २१४, विधानभवन, मुंबई या दालनात मतदानाबाबतच्या सूचना घेण्याकरता सकाळी ८ वाजता उपस्थित राहावे. आपल्याला देण्यात येणाऱ्या निर्देश आणि सूचनेप्रमाणे शिवसेना आमदारांनी मतदान पक्षादेशाप्रमाणे करायचे आहे. अत: शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांना कळवण्यात येते की, सदस्यांनी उपरोक्त दिवशी वेळेवर उपस्थित राहून पक्षाने दिलेल्या आदेशानुसार मतदान करावे, अशा पक्षादेश आहे.

- Advertisement -

दरम्यान, महाविकास आघाडीतील तसेच अपक्ष आमदारांमध्ये निधी वाटपावरुन नाराजी असल्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांच्या भाषणातून घेतली.

व्हिप म्हणजे काय?

व्हिप म्हणजे एक पक्षादेश असतो. यामध्ये आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम व्हिपद्वारे करण्यात येते. विधानसभेत एखाद्या महत्त्वाच्या मुद्यावर मतदान करायचे झाल्यास किंवा एखाद्या विरोधात मतदान करायचे असल्यास त्याबाबतचा आदेश व्हिपमार्फत जारी करण्यात येतो. तसेच हा व्हिप पक्षातील सर्व आमदारांना बंधनकारक असतो.


हेही वाचा – विरोधकांचं तोंड नसून गटार आहे, संजय राऊतांची टीका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -