सोमय्या हे कॅरेक्टर महाराष्ट्राला माहितीय, त्यांच्याकडून गरीबांना त्रास दिला जातो; किशोरी पेडणेकर बरसल्या

shiv sena kishori pednekar attack bjp leader kirit somaiya on worli SRA flats scam

भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर वरळीतील गोमाता जनता एसआरए इमारत प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप करत आहेत. याप्रकरणाचे कथित पुरावेही सोमय्यांकडून सादर केले होते. सोमय्यांच्या या आरोपांना आज पुन्हा किशोरी पेडणेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. जाणूनबुजून गरीब लोकांना कसा त्रास द्यायचा हे भाजपच्या किरीट सोमय्यांकडून शिकायाचं, किरीट सोमय्या हे कॅरेक्टर आता पूर्ण महाराष्ट्रात माहित झालं आहे, म्हणत पेडणेकरांनी सोमय्यांवर जहरी टीका केली आहे.

किशोरी पेडणेकर या एसआरए वरळी इथे राहत असल्याचं म्हणत मुंबई महापालिकेने केलेल्या चौकशी अहवालाचा हवाला देत सोमय्यांनी पेडणेकर यांनी घुसखोरी करत हा ताबा घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. ज्यावर आज किशोरी पेडणेकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

पेडणेकर म्हणाल्या की, अलोटीचं आहेत ज्यांना घर एसआरएने नावावर दिलं, जी बिल्डिंग, जी रुम त्याच ठिकाणी ते राहत आहेत. तरीपण कारण नसताना गरीबांना त्रास देणं आणि मला त्रास होईल अशा अर्थाने बदनामी केली जात आहे, मात्र या बदनामीला घाबरत नाही.

कारण ज्या घराशी माझा अकरा महिन्यांचा संबंध आला तर बाकीचा प्रश्न येतचं नाही. आज आपल्याकडे अनेक तक्रारी, केसेस प्रलंबित आहेत त्यावर कुठल्याही सरकारचं निवेदन नाही. क्रिश कॉर्पोरेट 2013 होती त्यानंतर त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. त्यानंतर माझ्या पतीने ज्याच्यासोबत पार्टनरशीप केली त्याने हे सगळं घेतलं. साडे नऊ, दहा वर्षांनी हे भाड्याने घेतलं, असंही पेडणेकर म्हणाल्या.

बिल्डिंग नंबर वेगळा, रुम नंबर वेगळा, नाव वेगळा, नोटीस वेगळी हे सगळं कोर्टात उघड होईल. म्हणजे एसआरएच्या लोकांनी जे दिलं ते स्वत:च्या प्रॉपर्टीबद्दलही खरं दिलं नाही. कारण का तर एसआरएच्या लोकांकडे किरीट सोमय्या बनवतात आणि दबाव टाकत सह्या करण्यासाठी दावणीला धरलं जातं असा आरोप करत पेडणेकरांनी या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे.

सोमय्यांचा नेमका आरोप काय?

दोन वर्षांपूर्वी मी तक्रार केली होती. आता त्यांना 48 तासांत गाळा रिकामा करावा लागणार आहे. पेडणेकर यांनी अनेक गाळे ढापले आहेत, त्यांनी कोरोना काळातही पैसे कमावले आहेत. आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तसंच मुंबई पोलिसांतही तक्रार दाखल केली आहे. आता जो आदेश निघालाय त्या आधारावर मी किशोरी पेडणेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी मुंबई पोलिसांकडे पुन्हा पाठपुरावा करणार, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.


मुंबईतील वन अविघ्न इमारतीतील आग नियंत्रणात, कोणतीही जीवितहानी नाही