स्वत:च्या बाळाला बाजूला ठेवायचं आणि दुसऱ्याच्या बाळाला…; मुंडेंचा उल्लेख करत पेडणेकरांचा भाजपाला टोला

shiv sena kishori pednekar slams bjp on pankaja munde statement ashish shelar

राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेनाविरुद्ध शिंदे -फडणवीस सरकार असा संघर्ष पाहायला मिळतोय. राज्यातील विविध मुद्द्यावरून शिवसेना आणि शिंदे फडणवीस सरकार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. यात भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी केलेल्या विधानावरून शिवसेना आणि विरोधी पक्षांनी भाजपला टार्गेट केले आहे. शिवसेना नेत्या किशोरी पेंडणेकर यांनीही यावरून भाजपावर खोचक शब्दात टीका केली आहे.

पंकजा मुंडे यांनी अलीकडेच एक विधान करत वाद ओढावून घेतला आहे. यावर आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले मात्र तरीही राजकीय वर्तुळात आता त्यांच्या विधानावरून उलट सुलट चर्चा रंगतेय. आपण आगामी निवडणुक लढताना काही बदल करुयात. ही निवडणूक पारंपारिक पद्धतीने न लढता वेगळ्या विषयावर लढू. जात – पात, पैसा- अडका, प्रभाव यापलीकडे जाऊयात. पंतप्रधान मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचंय. मी देखील वंशवादाचं प्रतिक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केले, तर मोदींनीही मला संपावायचं ठरवलं तरी ते संपवू शकत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. पंकजा मुंडेंच्या या विधानावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

… मग घ्या ना धौती योग; आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

ज्यावरून शिवसेना नेते किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, पंकजा मुंडेंनी भाजपामधील परिस्थितीला वाचा फोडल्याचं विधान केले, मी पंकजा मुंडेंवर बोलणार नाही, कारण त्यांच्या जन्माच्या आधीपासून त्यांचे वडील, आजोबा, काका, भाऊ असं सगळं कुटुंबचं राजकारणात मुरले आहेत. त्यांनी गोपीनाथ मुंडेंकडून राजकारणाचं बाळकडून घेतलं आहे, अस किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

पंकजा मुंडे स्पष्ट आणि कार्यशील महिला आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षातही खदखद बोलून दाखवली. स्वत:च्या बाळाला बाजूला ठेवायचं आणि दुसऱ्याच्या बाळाला मांडीवर घेऊन खाऊ- पिऊ घालून गुटगुटीत करण्याचा देशात ट्रेंड दिसतोय. त्याला पंकजा मुंडेंनी वाचा फोडली आहे. अशा शब्दांत किशोरी पेडणेकरांनी भाजपावर खोचक टीका केली आहे.


बोईसरमध्ये गोळीबारात तरुणीचा जागीच मृत्यू; पळून जाताना माथेफिरू तरुणाचाही मृत्यू