या चर्चेवर विश्वास ठेवू नका; तेसज ठाकरेंबाबत आदित्य ठाकरेंचे स्पष्ट मत

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंड केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे चांगलेच सक्रिय झाले आहेत.

Tejas Uddhav Thackeray

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंड केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे चांगलेच सक्रिय झाले आहेत. अशातच आता लवकरच राजकारणात ठाकरे घराण्यातील आणखी एक चेहरा म्हणजेच तेजस ठाकरे एन्ट्री घेणार असल्याचे बोलले जात आहे. तेजस ठाकरे याच्या राजकाराणातील एन्ट्रीबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, या चर्चांना आदित्य ठाकरे यांनी पुर्णविराम देत, या चर्चांवर विश्वास ठेवू नका असे म्हटले आहे. त्यामुळे आता तेजस ठाकरेंची राजकारणात कधी एन्ट्री होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (shiv sena leader aaditya thackeray reaction over tejas thackeray entry in politics)

तेजस ठाकरेंच्या सक्रिय राजकारणातील एण्ट्रीची चर्चा आदित्य ठाकरे यांनी फेटाळून लावली आहे. “या चर्चेवर विश्वास ठेवू नका. त्याला जेव्हा राजकारणात यायचे आहे, तेव्हा तो याबाबत निर्णय घेईल”, असे स्पष्ट मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केले.

बंडाळीनंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत, राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार स्थापन केले. तेव्हापासून शिवसेनेच्या नेत्यांकडून बंडखोरांवर टीका केली जात आहे. शिवाय आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा, शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिकांची भेट घेत आहेत. राज्यभरात दौरे करत असून, पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान, शिवसेना सध्या ऐतिसहासिक संकटात सापडली असून, संघटनेला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.

शिव संवाद आणि निष्ठा यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे जनतेची भेट घेत आहेत. तसेच, यावेळी जनतेला संबोधित करताना विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. याशिवाय, “कोणालाही गद्दारी पटलेली नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे. विषय बदलत राहायचे, गोलपोस्ट बदलत राहायचे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा एक प्रयत्न सुरू आहे. आमदारकीचा राजीनामा द्या निवडणुकीला सामोरे जा”, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना केले आहे.

याशिवाय, “तीन पक्ष बदलून झालेले आणि चौथ्या पक्षात पदार्पण करण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांवर किती विश्वास ठेवायचा याचा आपण विचार करायला हवा. गौप्यस्फोट करण्याचा प्रयत्न ते करत आहे. मात्र त्यांनी एवढी कारणे दिली आहेत की मी शिवसंवाद यात्रेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईपर्यंत यांचे कारण बदललेले असते”, असेही आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.


हेही वाचा – भाजपा आमदार नितेश राणेंचे दीपक केसरकरांना उत्तर, म्हणाले…