घरट्रेंडिंगसुहास कांदेंची नक्कीच भेट घेईन; बंडखोर आमदाराच्या आव्हानाला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

सुहास कांदेंची नक्कीच भेट घेईन; बंडखोर आमदाराच्या आव्हानाला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

Subscribe

बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी युवासेना अध्यक्ष आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात निवेदन देणार असल्याचे म्हटले होते. यावर आदित्य ठाकरे यांनी आपले मत मांडले आहे.

बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी युवासेना अध्यक्ष आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात निवेदन देणार असल्याचे म्हटले होते. यावर आदित्य ठाकरे यांनी आपले मत मांडले आहे. ‘आमदार सुहास कांदे यांची नक्कीच भेट घेईन, त्यांनी मातोश्रीवर यावे’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार आणि शिवसेना नेते यांच्या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. (Shiv sena leader aaditya thackeray will meet rebel mla suhas kande in nashik)

शिवसंवाद यात्रेकरीता नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर प्रासरमाध्यमांशी त्यांनी बातचीत केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपण आमदार सुहार कांदे यांनी नक्कीच भेटणार असल्याचे म्हटले. याशिवाय “सुहास कांदे यांनी इथे कशाला मातोश्रीवर येऊन भेटावे, मातोश्रीचे दरवाजे बंद नसून सर्वांसाठी खुले आहेत. त्यामुळे त्यांनी कधीही मातोश्रीवर येऊन भेटावे”, असेही त्यांनी म्हटले.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यावेळी आमदार सुहास कांदे “माझे काय चुकले?”, असे निवेदन देणार आहे. त्यानुसार, आदित्य यांची भेट घेण्यासाठी सुहास कांदे रवाना झाले आहेत. परंतु, त्यापूर्वी कांदे यांच्या ताफ्यातील गाड्यांना शिवसैनिक अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यात भेट होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

युवासेना अध्यक्ष आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेनंतर आता तीन दिवसांची शिवसंवाद यात्रा करत आहेत. बुधवारपासून महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी सुरुवात झाली आहे. या शिवसंवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्यात भिवंडी, नाशिक, दिंडोरी,औरंगाबाद आणि अहमदनगरमधील शिर्डीमधील शिवसैनिक आणि नागरिकांशी आदित्य ठाकरे संवाद साधणार आहेत. त्यानुसार आज आदित्य ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात बंडखोरांचा अडसर, माझं काय चुकलं?, सुहास कांदे विचारणार सवाल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -