आम्हाला शेंबडी पोरं, तर पत्रकारांना एचएमव्ही पत्रकार म्हटलं जातं; आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा

Aditya Thackeray

आम्ही जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आम्हाला कोणीतरी शेंबडी पोरं म्हणत, पत्रकार जेव्हा लिहितात एचएमव्ही पत्रकार म्हटले जाते. कुठेही माफी न मागता कारभार जसा चालवायचा तसा न चालवता मज्जा मस्ती चालली आहे. मागच्या वेळी बोललो की, बीएमसीमध्ये टाईमपास ट्रेंडर आणि ट्रान्सफर अस चाललं आहे. अशा शब्दात आज शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, विषय तेवढाच महत्त्वाचा आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून बघतोय कुठेही उत्तर न देता सत्तेची एक वेगळी मस्ती दाखवत, कृषी मंत्री महिलांना शिवीगाळ करतात, कुठेही पश्चाचाप होत नाही, माफी मागत नाही, कुठेही मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडून कान टोचले जात नाही. कारवाई होत नाही. त्यांचा टीईटी घोटाळा असेल, ओला दुष्काळ आहे कुठे हे वक्तव्य असेल, कुठेही शेतकरी मित्रांना मदत पोहचली नाही, फक्त घोषणांवर घोषणा होत आहेत पण शेतकऱ्यांनी खरी जी मदत पोहचायची आहे, ती अजून कुठेही पोहचली नाही. असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे.

कायदा सुव्यस्था तर आपल्याला माहितीच आहे, चिंधड्या उडत आहेत. दादर माहिममधील स्थानिक गद्दारांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला. त्यांच्यावर मनुष्यवदाचा गुन्हा दाखल झाला आहे, पण अजून अटक झालेली नाही. म्हणत त्यांनी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकरांसोबतच्या वादावर टीकास्त्र डागले आहे.


श्रद्धाने दिल्लीत येण्यापूर्वीच आफताबसोबत घेतला होता ब्रेकअपचा निर्णय