राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेनंतर शिवसेनेची नवी खेळी; आदित्य ठाकरे जाणार आयोध्येच्या दौऱ्यावर

महाराष्ट्रात शिवसेनेने, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिवसेने कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसोबत यूती केल्यानं विरोधीपक्ष भाजपानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत शिवसेनेवर टीका केली.

Aditya thackeray

महाराष्ट्रात शिवसेनेने, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिवसेने कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसोबत यूती केल्यानं विरोधीपक्ष भाजपानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत शिवसेनेवर टीका केली. तसंच, राज ठाकरे यांनी आपण आयोध्येदाला जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं भाजपासोबत आता मनसेकडूनही शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मात्र आता शिवसेनेनंही प्रत्युत्तराची तयारी केली असून, शिवसेनाही आयोध्येला जाणार आहे. तसंच, यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेऊन जाणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.

शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे काही महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यात या अयोध्येच्या दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती मिळते. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यातून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात येत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आदित्य ठाकरे आयोध्येला जाणार आहेत.

“बाबरी मशीदीचे ढाचे पाडण्यापासून ते राम मंदिराचा कळस उभारण्यापर्यंत मधल्या काळात अनेकदा आमचं जाणं येणं आहे. आयोध्येला आम्ही पाहुणे नाही. अयोध्या आमचं स्वागत करते. आम्ही जेव्हा तिथे जातो तेव्हा तिथले पुजारी रहिवासी आमच्या स्वागतासाठी येतात. गेल्या अनेक वर्षांपासून आमचा आणि त्यांचा परिचय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्या भेटीत असं ठरवलं होतं की, महाराष्ट्रातून जाणाऱ्या भाविकांसाठी तिथे निवासाची सोय करता यावी.”, असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं.

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आयोध्या दौऱ्यावर जाणार असल्यानं शिवसेनेची पुढीची भूमीका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.


हेही वाचा – Hanuman Chalisa: राज्यात दंगली घडवण्याचे इंटेलिजन्सचे गृहविभागाला इनपुट्स – संजय राऊत