घरताज्या घडामोडीअब्दुल सत्तार गद्दार, त्याला मातोश्रीची पायरी चढू देऊ नका - खैरे

अब्दुल सत्तार गद्दार, त्याला मातोश्रीची पायरी चढू देऊ नका – खैरे

Subscribe

काँग्रेसमधून शिवसेनेत येऊन राज्यमंत्रीपद मिळवलेल्या अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची चर्चा आज सुरु होती. त्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्तार गटाच्या सहा सदस्यांनी भाजपच्या बाजुने मतदान केल्यामुळे शिवसेनेचा उपाध्यक्ष पदाचा उमेदवार पराभुत झाला आहे. त्यानंतर शिवसेनेचे माजी खासदार ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून “अब्दुल सत्तार हे गद्दार असून त्यांना पवित्र अशा मातोश्रीची पायरी चढू देऊ नका” अशी टीका त्यांनी केली आहे.

अब्दुल सत्तार हे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्राकांत खैरे यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना मातोश्रीची पायरी चढू देऊ नका, असे सांगितले. आम्ही औरंगाबादेत शिवसेना वाढवली. अब्दुल सत्तारसारख्या लोकांना शिवसेना माहीत नाही, तरिही त्यांना मंत्रिपद देण्यात आले. तसेच माझी जि.प.अध्यक्ष डोणगावकर या देखील बाहेरून आल्यानंतर त्यांना अध्यक्षपद देण्यात आले होते. आता त्यांनी देखील भाजपसोबत जाऊन गद्दारी केली. मग आम्ही इतके दिवस शिवसेनेत एकनिष्ठ राहून काय फायदा, असा संतप्त सवाल खैरे यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

औरंगाबद जिल्हा परिषदेची निवडणुकी अंत्यत चुरशीची झाली. निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या मीनाताई शेळके आणि उपाध्यक्षपदी भाजपचे एल.जी. गायकवाड निवडून आले आहेत. अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी आणि भाजपला समसमान म्हणजे ३०-३० मते मिळाली होती. त्यानंतर चिठ्ठी उडवून अध्यक्षपदाच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या मीना शेळके यांना नशीबाची साथ मिळाली.

शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डेवयानी डोनगावकर यांनी बंडखोरी करत भाजपकडून निवडणूक लढवली होती. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक चांगलीची चुरशीची झाली. तसेच उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्तार गटाने गद्दारी केल्यामुळे शिवसेनेच्या शुभांगी काजवे यांचा पराभव झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -