किरीट सोमय्यांचं थोबाड लाल करणार- चंद्रकांत खैरेंचा इशारा

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना लक्ष्य केले. यापुढे जर शिवसेनेच्या विरोधात बोलाल तर थोबाड लाल करू असा धमकीवजा इशाराच यावेळी खैरे यांनी सोमय्यांना दिला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादला जाहीर सभा होत असून सभेआधी शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला . यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना लक्ष्य केले. यापुढे जर शिवसेनेच्या विरोधात बोलाल तर थोबाड लाल करू असा धमकीवजा इशाराच यावेळी खैरे यांनी सोमय्यांना दिला.

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका करत आहेत. आज औरंगाबादमध्ये होत असलेल्या सभेत शिवसेनेच्या नेत्यांनी याचमुद्द्यावरून भाजपच्या नेत्यांचा समाचार घेत आहेत. खैरे यांनी यावेळी सोमय्या हे फालतू असून मी त्यांना शक्ती कपूर म्हणतो. किरीट सोमय्या नेहमी थोबाड वाकड करुन उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत टीका करतात. पण त्यांनी औरंगाबादमध्ये येऊन असे विधान केले तर त्यांच थोबाड लाल करू असा इशारा यावेळी खैरे यांनी दिला. तसेच खैरे एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर आगपाखड केली. भाजपने जसा उद्धव ठाकरे यांना धोका दिला तसाच दानवेंनी मला धोका दिला. त्यांनी युतीचा धर्म पाळला नाही असा आरोपच खैरे यांनी केला.तसेच भाजपवाले जाणीवपूर्वक ठाकरे कुटुंबाला बदनाम करत आहेत असेही खैरे यावेळी म्हणाले .