घरताज्या घडामोडीराज्यात लसीकरणासाठी केरळ पॅटर्न राबवा, शिवसेना नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात लसीकरणासाठी केरळ पॅटर्न राबवा, शिवसेना नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Subscribe

लसीच्या एका कुपीतून १० लोकांना लस देता येते. त्यामुळे तेवढे लोक असल्याशिवाय संबंधित केंद्रावर लसीकरणाला सुरुवात केली जात नसे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. अधिका-अधिक नागरिकांना लसीकरण करण्याचे लक्ष्य राज्य सरकारने केले आहे. परंतु मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यासाठी लसीचा पुरवठा नियमित होत नसल्यामुळे केंद्रावर टीक करण्यात येत आहे. परंतु राज्यातील नागरिकांना प्रभावीपणे लसीकरण करण्यासाठी केरळ पॅटर्नचा अवलंब करा अशी मागणी माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक सावंत यांनी केली आहे. महाराष्ट्रात लसीकरणावेळी मोठ्या प्रमाणात लसीचा अपव्यय होत आहे. तो रोखण्यासाठी केरळमध्ये ज्या प्रकारे लसीकरण करण्यात आले त्याप्रमाणे महाराष्ट्रातही करण्यात यावे अशा मागणीचे पत्र दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले आहे.

राज्यात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी केरळ पॅटर्नचा अवलंब करा, अशी मागणी माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक सावंत यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवले आहे. केंद्र सरकारकडून केरळला ७३ लाख २६ हजार ८०६ लस प्राप्त झाल्या.मात्र, त्यामधून ७४ लाख २६ हजार १६४ लोकांना लस देण्यात आली. त्यामुळे ८८ हजार जास्त लोकांना लस देण्यात केरळ सरकारला यश मिळाले . लसीची थोडीही मात्रा फुकट जाऊ न दिल्यामुळे केरळला ही गोष्ट साध्य झाल्याचे दीपक सावंत यांनी पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

त्यासाठी लसीकरण केंद्रांवर योग्य नियोजन करण्यात आले. लसीच्या एका कुपीतून १० लोकांना लस देता येते. त्यामुळे तेवढे लोक असल्याशिवाय संबंधित केंद्रावर लसीकरणाला सुरुवात केली जात नसे. त्यासाठी ऑटो डिसपोझेबल सिरिंज वापरण्यात आल्याचे दीपक सावंत यांनी पत्रात म्हटले आहे.  असाच प्रोटोकॉल महाराष्ट्र सरकारने आपल्याकडे तयार करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात लसीकरण पुरवठ्याबाबत  होणाऱ्या वादावर तोडगा निघू शकेल, असा विश्वास दीपक सावंत यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -