“…तुमच्या मनातील सूर्याला आम्ही भीक घालणार नाही”; शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Shiv Sena leader Deepali Syed) यांनी अपशब्द वापरत टीका केली होती. त्यानंतर दिपाली सय्यद आणि भाजपा (BJP) यांच्यातील संघर्ष वाढू लागला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Shiv Sena leader Deepali Syed) यांनी अपशब्द वापरत टीका केली होती. त्यानंतर दिपाली सय्यद आणि भाजपा (BJP) यांच्यातील संघर्ष वाढू लागला आहे. पंतप्रधानांविरोधातील त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिपाली सय्यद यांच्यावर हल्लबोल केला. त्यावर पुन्हा एकदा आता दिपाली यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘फडणवीस साहेब तुमच्या मनातील सुर्या पेक्षा हा आमचा संयुक्त महाराष्ट्र खुप मोठा आहे’, अशा शब्दांत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

दिपाली सय्यद यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दिपाली सय्यद म्हणाल्या की, “फडणवीस साहेब तुमच्या मनातील सुर्या पेक्षा हा आमचा संयुक्त महाराष्ट्र खुप मोठा आहे. त्यात आग लावण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या मनातील सुर्याला सुद्धा आम्ही भिक घालणार नाही. सुर्यावर कसे थुंकतात याचे धडे आम्हाला श्रीलंका कडुन घेण्याची गरज नाही. शिवसेना अंगार है ।”, अशा शब्दांत त्यांनी प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

“सूर्याकडे पाहून थुंकलं तर ती थुंकी स्वत:च्या तोंडावर पडते, त्यांनी सुर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार केला आहे. त्यांमुळे थुंकी त्यांच्याच तोंडावर पडेल.”, अशी टीका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दीपाली सय्यद यांच्यावर केली. त्यावर आज दिपाली सय्यद यांनी उत्तर देत टीका केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या जयंतीनिमित्त चौंडी (जामखेड) येथे जयंती सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) या जयंती सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. मात्र, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना या कार्यक्रम स्थळी जाण्यापासून रोखलं आहे या पार्श्वभूमिवर फडणवीस पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी दीपाली सय्यद (Dipali Sayyed) यांच्यावर टीका केली होती.


हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : आज अयोध्येत होणार राम मंदिर गाभाऱ्याची पायाभरणी, मुख्यमंत्री योगींच्या हस्ते शुभारंभ