कोल्हापूरातील शिवसेनेचा ‘हा’ नेता नॉट रिचेबल

Shivsena
शिवसेना

मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर कोल्हापूराती शिवसेनेचे मोठा नेते नॉट रिचेबल झाले आहे. माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांची एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही दोन दिवसांपूर्वी क्षीरसागर यांना फोन करून चर्चा केली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या फोनाफोनीनंतर राजे क्षीरसागर शिंदे गटात गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. अलीकडेच कोल्हापूर उत्तर निवडणुकीमध्ये दरम्यान उमेदवारी न मिळाल्याने क्षीरसागर नाराज होते.

जिल्ह्याती हे नेते शिंदे यांच्या सोबत – 

जिल्ह्याती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आहेत. विमानतळावरील समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ते कैद झाले होते. जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकरही नॉटरिचेबल झाले होते.