घरताज्या घडामोडीमंचावर उभे राहून सभा गाजवणाऱ्या गुलाबराव पाटलांनी गायली कव्वाली, सर्वांनाच केलं मंत्रमुग्ध

मंचावर उभे राहून सभा गाजवणाऱ्या गुलाबराव पाटलांनी गायली कव्वाली, सर्वांनाच केलं मंत्रमुग्ध

Subscribe

शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांना आपण नेहमीच सभा, मेळावा किंवा कार्यक्रमात मंचावरुन भाषण देताना बघितले आहे. सभेदरम्यान गुलाबराव पाटलांचा आक्रमकपणाही पाहिला असेल परंतु एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. गुलाबराव पाटील यांनी कार्यक्रमात चढता सुरज धीरे धीरे ही अजीझ नाझा यांची कव्वाली गायली आणि उपस्थित सर्वांनाच मंत्रमुग्ध करुन टाकले आहे.

शिवेसना नेते गुलाबराव पाटील जळगावात एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम घेण्यात आला होता. राज्यात सगळीकडेच दिवाळी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमांना नेते मंडळीही हजेरी लावत आहेत. तसेच कार्यक्रमात नेत्यांमधील कला पाहायला मिळत आहेत.

- Advertisement -

गुलाबराव पाटील अशाच एका कार्यक्रमासाठी जळगावमध्ये उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार गुलाबराव पाटील यांनी कव्वाली गायली. चढता सुरज धीरे धीरे ही अजरामर कव्वाली गुलाबराव पाटील यांनी सुरात गायली. यामुळे उपस्थित सर्वच गुलाबरावांच्या कव्वालीला दाद देत होते. तसेच सभा गाजवणाऱ्या गुलाबराव पाटील यांना एवढ्या सुरात कव्वाली गाताना पाहून कार्यकर्तेही अचंबित झाले होते.

कव्वाली गातानाचा गुलाबराव पाटील यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गुलाबराव पाटील हे कार्यकर्त्यांच्या घोळक्यामध्ये बसून कव्वाली गात आहेत. तसेच त्यांना एक ढोलकी पटू साथ देत आहे. व्हिडिओतील सर्वच उपस्थित गुलाबराव पाटील यांची कव्वाली ऐकून मंत्रमुग्ध झाले असल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

हेही वाचा :  नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढलेलं दिसतंय, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -