तू कधी रे कानफाटात खाल्ली, मोठा भाईगिरी दाखवतो आम्हाला; संजय राऊतांचे नारायण राणेंना चोख प्रत्युत्तर

shiv sena leader sanjay raut attack narayan rane over his serious allegation uddhav thackeray rashmi thackeray

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील शाब्दिक वाद दिवसेंदिवस पेटतोय. अशात आज सकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राऊतांचा एकेरी उल्लेख करत राऊतांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली, पक्ष संपवल्याचा त्यांना आनंद होतेय असा आरोप करत संजय राऊत आजच्या राजकारणातील जोकर असून मातोश्रीला सुरुंग लावणारे विष आहे, ते एक विषारी प्राणी आहेत, अशी जहरी टीका राणेंनी केली. याच टीकेला आता खासदार संजय राऊतांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. हे धमक्या, दादागिरी करू नका, आमचं अख्ख आयुष्य रस्त्यावर गेलं आहे. तू कधी रे कानफाटात खाल्ली, मोठा भाईगिरी दाखवतो आम्हाला, या दाखवतो म्हणत राऊतांनी आता नारायण राणेंनाच थेट आव्हान दिलं आहे. तसेच नारायण राणेंच केंद्रीय मंत्रीपद जाणार असा दावाही राऊतांनी केला आहे. संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर असून यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राणेंवर सडकून टीका केली आहे.

नारायण राणेंना पक्ष सोडल्यापासून आयुष्यात कधीही भेटलो नाही

राऊत म्हणाले की, नारायण राणेंना पक्ष सोडल्यापासून आयुष्यात कधीही भेटलो नाही. मी बेईमान, गद्दारांना भेटत नाही, त्यांचं तोंडही पाहत नाही. राणेंना उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा झाली हे चांगल लक्षण आहे. मी त्यांच्या भेटीसाठी निमित्त ठरते असेन. राणे यांच्या वक्तव्यावर आताच माझे उद्धव ठाकरे यांच्यांशी बोलणे झालं. त्यावेळी उद्धव ठाकरे हसत होते.

तुम्ही तुमच्या कर्माने जगा, कर्माने मरा

राणे यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यावर अत्यंत घाणेरड्या शब्दात चिखल फेक करण्यास सुरुवात केली, आमच्यावर संस्कार आहेत, सुरुवात कोणी केली. राणेंनी पक्ष सोडला, त्यांनी दुसरा मार्ग स्वीकारला तर त्यांनी शांतपणे जगा, तुम्ही तुमच्या कर्माने जगा, कर्माने मरा, असही राऊत म्हणालेय.

कधी काळी मोदी आणि अमित शाहांना ज्ञान देत होते. कोण आहात तुम्ही?

आदित्य ठाकरेंवर नारायण राणे, त्यांची मुलं किती घाणरडे आरोप करतात, काय पुरावे आहेत? उद्धव ठाकरेंविषयी कोणत्या भाषेत बोलता? रश्मी ठाकरेंसंदर्भात ते कोणत्या भाषेत बोलत होते. शरद पवारांनी ते ज्ञान देत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याविषयी काय बोलले होते? कधी काळी मोदी आणि अमित शाहांना ज्ञान देत होते. कोण आहात तुम्ही? असा थेट सवालही राऊतांनी नारायण राणे यांना विचारला आहे.

नारायण राणे यांच केंद्रीय मंत्रीपद जाणार

आत्ता त्यांना अहो, जाओ करतोय, पण परत सांगतो, आता आमच्या नादाला यापुढे कोणी लागला तर तुम्हाला कळेल आम्ही काय आहे, असा इशाराचं राऊतांनी दिला आहे. माझ्या माहितीनुसार नारायण राणे यांच केंद्रीय मंत्रीपद जातंय. त्याला कारणं खूप आहेत. नवीन गटातील लोकांना सामावून घ्यायचं आहे. त्यामुळे राणेंना काढायचं सुरू आहे असं ऐकलं. पीएमओकडे आमचीही माणसं आहेत. आम्हालाही माहिती मिळते. मला त्यात पडायचं नाही. तुम्ही आमच्यात पडू नका, असं राऊत म्हणाले.

तुम्ही आमची काय उखाडणार? तू कोण आहे? लाचार माणूस

बाडगा जास्त मोठ्या बांग देतो असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. तो सिलिंडर जास्त मोठं करतो. सध्या हे सिलिंडरवर करून बोलत आहेत. तुम्ही आमच्याविरोधात उभं राहिला. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी संयम राखायला सांगितलं. तुम्ही आमची काय उखाडणार? तू कोण आहे? लाचार माणूस आहे. दहापक्ष बदलतो घाबरून. डरपोक. आम्हाला डरपोकांना घाबरण्याचं कारण नाही, अशा शब्दात राऊतांनी नारायण राणेंवर घणाघाती टीका केली आहे.


…तर रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे संजय राऊतांना चपलेनं मारतील; राणेंचा नवा वाद